घरमहाराष्ट्रMumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

Mumbai Sakinaka Rape : साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

Subscribe

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचं घृणास्पद कृत्य नराधम आरोपीनं केलं होतं. या प्रकारामुळे मुंबईत पुन्हा एकदा महिला असुरक्षित असल्याचे चित्र समोर आले आहे. या महिलेची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान या पीडित महिलेचा आज मृत्यू झाला आहे.

नेमकी घटना काय होती?

मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ माजली असून संतापाचं वातावरण पसरले आहे. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. एका टेम्पोत हा सगळा प्रकार करण्यात आला. मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडे तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथील खैरानी रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध असल्याची माहिती देणारा फोन आला. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच पीडित महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. पीडितेवर उपचार सुरु होते मात्र तिची प्रकृती गंभीर झाल्याने आज तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून अजून आरोपी यामध्ये सहभागी असावेत असा पोलिसांना संशय असून तपास सुरु केला आहे.

चित्रा वाघ यांची प्रतिक्रया 

दरम्यान, या घटनेवर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दुःख व्यक्त केलं आहे. साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई…आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही पणया मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना नाही वाचवू शकलो तुला. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

 


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -