Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे

राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे

Subscribe

दरम्यान, पोलीस कोणताही गुन्हा दाखल करीत असताना त्याचा संपूर्ण अभ्यास करूनच दाखल करीत असतात. न्यायालयाने काय टिप्पणी करायची हा न्यायालयाचा अधिकार आहे. हे केवळ न्यायालयाचे निरीक्षण असून या प्रकरणावर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी आहे.

राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्याला दिलेल्या जामिनाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली. यातील नोंदीनुसार पोलिसांच्या नोटीसनंतर राणा दाम्पत्य घराबाहेर पडले नाहीत. राणा दाम्पत्याला अटक होण्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचे आंदोलन मागे घेतले होते. हिंसक मार्गाने सरकार पाडण्याचा त्यांचा हेतू नव्हता. राणांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली, पण त्यासाठी 124 अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे, अशा शब्दांत सत्र न्यायालयाने ठाकरे सरकारला चपराक लगावली.

दरम्यान, पोलीस कोणताही गुन्हा दाखल करीत असताना त्याचा संपूर्ण अभ्यास करूनच दाखल करीत असतात. न्यायालयाने काय टिप्पणी करायची हा न्यायालयाचा अधिकार आहे. हे केवळ न्यायालयाचे निरीक्षण असून या प्रकरणावर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी आहे. आवश्यकता भासल्यास राज्य सरकारकडून यासंबंधीचे आणखी पुरावे देण्यात येतील, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या जाहीर घोषणेवरून झालेल्या वादानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौर्‍याचे कारण देत या दाम्पत्याने आपली घोषणा मागे घेतली होती.

 

- Advertisement -

 

- Advertisment -