घरमहाराष्ट्रठरलेल्या नवर्‍याने पाठवलेले अश्लील मेसेज हा अवमान नाही - सत्र न्यायालय

ठरलेल्या नवर्‍याने पाठवलेले अश्लील मेसेज हा अवमान नाही – सत्र न्यायालय

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईमधील न्यायालयाने होणार्‍या पत्नीला लग्नाआधी अश्लील मेसेज पाठवण्याच्या प्रकरणासंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिलाय. न्यायालयाने या प्रकरणामध्ये एका ३६ वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता केलीय. महिलेची फसवणूक करणे आणि बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भातील हा खटला होता. हा खटला मागील ११ वर्षांपासून सुरू होता. लग्नाच्या आधी लग्न ठरलेल्या मुलीला ‘अश्लील मेसेज’ पाठवल्याने समोरच्या व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, अपमान केला असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबईमधील सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात लग्न ठरलेल्या व्यक्तीला असे मेजेस पाठवल्याने आनंद मिळतो, असा उल्लेख करण्यात आलाय. तसेच अशा मेसेजेसमुळे समोरची व्यक्ती आपल्या भावना समजून घेण्याइतकी आपल्या जवळची आहे असेही वाटते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

- Advertisement -

जर समोरच्या व्यक्तीला हे आवडत नसेल तर त्यासंदर्भात विवेकपूर्ण पद्धतीने सांगावे. तसेच समोरची व्यक्ती सामान्यपणे अशा पद्धतीची चूक पुन्हा करत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. असे मेसेज आवडले नाही तरी कोणत्याही पद्धतीने अमुक एका मेसेजमुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला, अपमान केला असे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणामध्ये तक्रारदार महिलेने २०१० मध्ये एका व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला होता. हे दोघेही २००७ साली एका लग्न जुळवणार्‍या मॅट्रीमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून भेटले होते. मात्र, या तरुणाच्या आईचा लग्नाला विरोध होता. त्यानंतर या तरुणाने तीन वर्षे प्रयत्न करुनही नाते पुढे जाणार नाही हे लक्षात आल्यानंतर आणि लग्नानंतर कसे आणि कुठे रहावे याबद्दल मतभेद असल्याने मुलीसोबतचे सर्व संबंध तोडले. न्यायालयाने या प्रकरणामध्ये निकाल देताना लग्नाचे आश्वासन देऊन नंतर नकार देण्याला विश्वासघात करणे किंवा बलात्कार करणे असे म्हणता येणार नाही, असा निकाल देत न्यायालयाने तरुणाची निर्दोष मुक्तता केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -