आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा; एनसीबीने जप्त केलेला पासापोर्ट परत देण्याचे आदेश

mumbai Special Court Directs NCB to Return aryan khans Passport in cruise drugs case

कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आर्यन खानने 30 जून रोजी विशेष एनडीपीएस कोर्टात आपला पासपोर्ट परत मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने एनसीबीला उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत आर्यन खानचा मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने एनसीबीने आर्यन खानचा जप्त केलेला पासपोर्ट परत देण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामुळे आर्यन खानचा परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती. मात्र एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खानचे नाव वगळण्यात आल्याने क्लीन चीट मिळाली आहे. या प्रकरणातील तपासात आर्यन खानचा कोणताही संबंध नसल्याने आर्यनला त्याचा पासपोर्ट परत देण्याचे आदेश कोर्टाने एनसीबीला दिले आहेत. त्यानुसार अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आर्यनला त्याचा पासपोर्ट मिळाला आहे.

हेही वाचा : आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : 2 NCB अधिकाऱ्यांचे निलंबन, मुख्य तपास अधिकाऱ्यासह गुप्तचर अधिकारी निलंबित

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा जप्त केला होता. यावेळी क्रुझवरून बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता शाहरूख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा याच्यासह 20 जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आर्यन खानसह त्याच्या मित्रांना बरेच दिवस तुरुंगात राहावे लागले. यानंतर आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचीट मिळाली आहे.


मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री अनंतात विलीन