घरमहाराष्ट्रकोस्टल रोडच्या कामासाठी मुंबईच्या वाहतुकीत बदल, 'हे' पर्यायी मार्ग लक्षात ठेवा!

कोस्टल रोडच्या कामासाठी मुंबईच्या वाहतुकीत बदल, ‘हे’ पर्यायी मार्ग लक्षात ठेवा!

Subscribe

Transport Route Change in Mumbai | ड्रेनेज आऊटफॉलचे काम करण्याकरता हा रस्ता बंद करण्यात येत असून त्याजागी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. पर्याय रस्ता अरुंद असल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते.

Transport Route Change in Mumbai | मुंबई – मुंबईत विविध ठिकाणी विकासकामे, मेट्रोची कामे सुरू असल्याने अनेकवेळा वाहतुकीच्या मार्गात बदल करावा लागतो. सध्या कोस्टल रोडच्या कामासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत किंचित बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यावरील वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

मरिन ड्राईव्ह येथे कोस्टल रोडचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या येथे ड्रेनेज आऊटफॉलचे काम सुरू करण्यात आले आहे. ड्रेनेज आऊटफॉलचे काम करण्याकरता हा रस्ता बंद करण्यात येत असून त्याजागी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. पर्यायी रस्ता अरुंद असल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई-ठाण्यात धुवाँधार, अवकाळी पावसामुळे नोकरदारांची तारांबळ; रेल्वेची स्थिती काय?

हे आहेत पर्यायी मार्ग

    • चर्चगेट तसेच दक्षिण मुंबईत जाण्यासाठी केम्प्स कॉर्नर, नाना चौक, ऑपेरा हाऊस, सैफी रुग्णालय, मरीन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर कार्यालय, चर्चगेट जंक्शन, गोदरेज जंक्शन या मार्गाचा वापर करा.
    • चर्चगेट जंक्शन येथून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी पेडर रोड, आरटीआय जंक्शन, सेसिल जंक्शन, सुख सागर जंक्शन, (डावीकडे वळण) ऑपेरा हाऊस, सैफी रुग्णालय, मरिन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर विभाग कार्यालय मार्गाचा वापर करू शकता.
    • दक्षिण मुंबईत वाळकेश्वर, बँडस्टँड, विल्सन कॉलेज, विनोली चौपाटी, (डावीकडे वळण), ऑपेरा हाउस, सैफी रुग्णालय, मरिन लाइन्स स्थानक, प्राप्तिकर विभाग कार्यालयामार्गेही जाऊ शकता.
    • सागरी किनारा बांधकाम एजन्सीने मरिन ड्राइव्हच्या दक्षिणेकडील ड्रेनेज आउटफॉलचे काम करणे आवश्यक असून या कामासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तारापोरवाला मत्स्यालय ते इस्लाम जिमखाना दरम्यानचा रस्ता बंद करण्यात आला आहे.
- Advertisement -

दरम्यान, वाकोला पुलावर दोन वाहनांमध्ये अपघात झाल्याने दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे घराबाहेर पडताना वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊनच प्रवासाला सुुरुवात करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -