घरमहाराष्ट्रमुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी सत्राच्या परीक्षा १० ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होणार होत्या. त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठाकडे मागणी केली होती. त्यावर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून २०२२ च्या हिवाळी सत्राच्या सत्र ५ बरोबरच सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई विद्यापीठ २०२२ च्या हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा व आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या ४५० पेक्षा जास्त परीक्षा घेणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात २९ सप्टेंबर रोजी युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबकर, शशिकांत झोरे आणि मिलिंद साटम यांनी विद्यार्थी व महाविद्यालयांच्या वतीने परीक्षा नियंत्रकांच्या कार्यालयाला घेराव घालून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाल्याने परीक्षेचा अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यानी केली होती.

२०२२ च्या हिवाळी सत्राच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.
– डॉ. प्रसाद कारंडे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -