घरताज्या घडामोडीराज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद

राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद

Subscribe

राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची संततधार कायम असल्याने सखल भागांत पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा गुरूवारी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची संततधार कायम असल्याने सखल भागांत पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा गुरूवारी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच, हवामान विभागाकडून मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल या महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शिवाय, मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. (Mumbai university tomorrow exam postponed thane Navi Mumbai Panvel school close)

अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करणार आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई वगळता सर्व ठिकाणी शाळांना सुटी देण्यात आल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शिवाय, पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठाण्यात अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या शाळांना १४ आणि १५ जुलै रोजी अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोकणात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. रायगड जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आज गुरुवारी रायगड जिल्ह्यातील सगळ्या माध्यमातील शाळा, महाविद्यालयांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना गुरुवारी सुट्टी जाहीर करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.


हेही वाचा – मुंबईत वाऱ्यासह पावसाची बरसात ; पवई येथे दरड कोसळली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -