mumbai vaccination: मुंबईत पुढील ३ दिवस लसीकरणाला ब्रेक, सोमवारपासून होणार सुरुवात

elderly need medical certificates for booster dose list has 20 categories of comorbidities
Precaution Dose साठी ज्येष्ठांना मेडिकल सर्टिफिकेट बंधनकारक, लिस्टमध्ये २० आजारांचा समावेश

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोना लसीकरण मुंबईत वेगाने करण्यात येत होते. लसीचा साठा जास्त मिळत नव्हता यामुळे लसीकरणाला ब्रेक लागत होता. पंरतु सध्या लसीचा साठा असताना प्रशासनानं लसीकरण ४ दिवस बंद ठेवलं आहे. आजपासून पुढील ३ दिवस मुंबईतील महानगरपालिकेची लसीकरण सेंटर बंद असणार आहेत. सोमवारपासून सर्व लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येणार आहे. मुंबईत लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुण्यातही आजपासून ३ दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच एक प्रभावी उपाय असल्यामुळे राज्यात लसीकरण वेगाने करण्यात येत आहे.

मुंबईत दिवाळीदरम्यान पुढील ३ दिवस म्हणजेच शुक्रवार, शनिवार, रविवारी सर्व शासकीय आणि महानगरपालिकेचे लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. थेट सोमवारपासून लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. मुंबई महानगरपालिकेकडे कोरोनाप्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे सोमवारपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.

पुण्यात पुढील ३ दिवस लसीकरण बंद

पुण्यात देखील लसीकरण बंद असणार आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात फक्त लसीकरण करण्यात येईल यानंतर थेट सोमवारपासून लसीकरण करण्यात येणार आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयातही लसीकरण बंद असेल. दिवाळी सणाचे दिवस असल्याने कोरोना लसीकरण केंद्रांवर नागरिकांचा तुरळक प्रतिसाद आहे. लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पुढील ३ दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत १८ वर्षांवरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.


हेही वाचा : Live Update: पवार कुटुंबीयांच्या दिवाळी भेट कार्यक्रमाला सुरुवात, शरद पवार उपस्थित