मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा ६५ टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यानुसार, सातही तलावांतील जलसाठा ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजघडीला तलावांमध्ये एकूण ९ लाख ५२ हजार दशलक्ष लिटरवर वापरायुक्त पाणी उपलब्ध झाले आहे.

Water Resources That Supply Water To Mumbai

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यानुसार, सातही तलावांतील जलसाठा ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजघडीला तलावांमध्ये एकूण ९ लाख ५२ हजार दशलक्ष लिटरवर वापरायुक्त पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाणी टंचाईची चिंता मिटली आहे. (Mumbai Water Storage In Lakes At 65 Percent Increase)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणामध्ये सध्या ६५.८१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात भरघोस वाढ झाली आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने ७ जुलै रोजी १० टक्के पाणी कपातीचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर पावसाची संततधार कायम असून ५ दिवसात जलसाठा ५० टक्क्यांवर आला आहे. मोडक सागर तलाव बुधवारी भरून वाहू लागल्यानंतर आता विहार, तुळशी हे मुंबईजवळचे तलावही ओव्हरफ्लो होण्याची शक्यात वर्तवण्यात आली आहे.

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये तलावांतील जलसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. त्यावेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्यास पाणी कपातीची आवश्यकता भासत नाही. सध्या सातही धरणांत नऊ लाख ५२ हजार ५५० दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. पावसाळ्याचे अडीच महिने शिल्लक असून तोपर्यंत तलाव काठोकाठ भरतील अशी अपेक्षा आहे.


हेही वाचा – पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त, राज्य सरकारची व्हॅटमध्ये कपात