Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मोठी बातमी: अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीचे दोन व्हीप

मोठी बातमी: अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीचे दोन व्हीप

Subscribe

अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता दोन व्हीप जारी करण्यात आले आहेत. एकीकडे सुनिल तटकरे यांनी व्हीप काढलाय. तर दुसरीकडे मोहम्मद फझल यांनीही व्हीप काढला. राष्ट्रवादीचे खासदार लोकसभेत मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार की विरोधात याची उत्सुकता आता वाढत आहे.

अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता दोन व्हीप जारी करण्यात आले आहेत. एकीकडे सुनिल तटकरे यांनी व्हीप काढलाय. तर दुसरीकडे मोहम्मद फझल यांनीही व्हीप काढला. राष्ट्रवादीचे खासदार लोकसभेत मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार की विरोधात याची उत्सुकता आता वाढत आहे. सध्या संसदेच्या या अधिवेशनामध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे आणि या अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी आता राष्ट्रवादीकडून दोन व्हीप काढण्यात आले आहेत.
( Mumbai Whips were drawn from both factions of the NCP for the vote on the no confidence motion )

( हेही वाचा: ‘ईडी ही दहशतवादी संघटना’; संजय राऊतांचा घणाघात )

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर दोन व्हिप निघाले आहेत. लोकसभेत राष्ट्रवादीचे पाच खासदार आहेत. त्यापैकी चार खासदार महाराष्ट्रातले असून एक खासदार हा लक्षद्वीपचा आहे. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फजल हे खासदार शरद पवरा गटाचे आहेत. तर सुनिल तटकरे हे अजित पवार गटाचे आहेत. सुनिल तटकरे यांनी काढलेल्या व्हिपमध्ये सर्वांना मोदी सरकारच्या बाजूने आणि अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे मोहम्मद फजल यांनी व्हिप जारी करून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा अध्यक्ष कोणत्या व्हिपला अधिकृत व्हिप म्हणून मान्यता देतात, यावर पुढील कारवाईचं भवितव्य अवलंबून असतं. व्हिपचं उल्लंघन हा पक्षांतर बंदीच्या कायद्यातील गंभीर गुन्हा समजला जातो, ज्याद्वारे अपात्रतेची टांगती तलवार असते. त्यापैकी कोणत्या पर्यायांचा वापर होणार की सभागृहात प्रत्यक्ष हजर राहून अविश्वास ठरावाच्या बाजूने किंवा विरोधात मतदान करणार हे पाहावं लागेल.

विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता ते या प्रस्तावावर लोकसभेत भाषण करतील. 2018 मध्येही मोदींना अविश्वास प्रस्तावाला सामोर जावं लागलं होतं. तेव्हाही विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं. आजही मतदान झालं तर अविश्वास ठराव फेटाळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -