घरताज्या घडामोडीमुंबईला दोन वर्षात खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

मुंबईला दोन वर्षात खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन

Subscribe

मुंबईला येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबईला येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी आज एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुंबईला पुढील २ वर्षात खड्डेमुक्त करण्यासाठी योजना आखण्यात आली. दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. परिणामी अपघातांना आमंत्रण दिले जाते. त्यामुळे आता या त्रासातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी शिंदेंनी नव्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

महापालिका अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांनी “४२३ किलोमीटरचे रस्ते सिमेंट-कॉक्रिंटचे करण्यात येणार आहेत. यासाठी मार्च २०२३ पर्यंत निविधा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. जेणेकरून पुढील दोन वर्षांच मुंबईचे सर्व रस्ते खड्डेमुक्त होती. यासाठी एक संकल्प केला जात आहे”, असे म्हटले.

- Advertisement -

“पावसाचे पाणी जमीनीमध्ये झिरपण्यासाठी सॉफ्ट क्विट आणि डक म्हणजेच पाणी शोसुन घेणारे खड्ड्यांचे बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे सर्व पाणी समुद्रात न जाता जमीनीत मुरेल आणि जमीनी पाण्याची पातळी व्यवस्थित राहिल, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत”, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“दरवर्षी पावसाळ्यात कोल्डमिक्सने खड्डे बुजवले जातात. परंतु जास्तीचा पाऊस झाल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये टाकलेली खडी बाहेर येते आणि पुन्हा त्या ठिकाणी खड्डे निर्माण होतात. परिणामी दुचाकी चालकांचे अपघात होतात. त्यामुळे यंदा मुंबईकरांना खड्ड्यांच्या त्रासातून बाहेर काढण्यासाठी जीओ पॉलिमार या नव्या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. या यंत्रणेमुळे रस्ते जलद गतीने भरले आणि सुकले जातात. त्यामुळे येत्या काळात येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना खड्ड्यांच्या त्रास होणार नाही.”, असेही शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“सद्यस्थितीत २३६ किलोमीटर रस्त्यांच्या सिमेंट-कॉक्रिंटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासंदर्भातील सर्व निविधा आणि इतर परवानग्या मिळालेल्या आहेत. यासाठी २२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

रस्ते कामांवर सीसीटीव्हीची नजर

त्याचप्रमाणे रस्त्यांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये आणि प्रमुख अभियंता (रस्ते), उपप्रमुख अभियंता (रस्ते) यांच्या कार्यालयाला देखील जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला या रस्त्यांवर थेट नजर ठेवता येणार आहे.

यंदा ४,९०० कोटींची रस्त्यांची कामे

मुंबईत यंदा ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची जी कामे प्रस्तावित आहेत, त्यामध्ये – शहर विभागात ५० किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ८०० कोटी, पूर्व उपनगरात ७५ किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ६०० कोटी तर पश्चिम उपनगरात २७५ किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ३ हजार ५०० कोटी असा एकूण ४ हजार ९०० कोटींचा खर्च करावा लागणार आहे. यामध्ये १३.४० मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण पॅसेजमध्ये (२०० मिलिमीटर जाड काँक्रिट थराचा रस्ता) करण्यात येतील. तर १३.४० मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांची सुधारणा (२८० मिलिमीटर जाड काँक्रिट थर) सिमेंट काँक्रिटीकरणमध्ये करण्यात येईल.


हेही वाचा – शिंदे गटात सामिल झाल्यानंतर गुलाबराव पाटलांनी ‘ती’ रुग्णवाहिका घेतली परत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -