मुंबईवर ५ हजार सीसीटीव्हीचा वॉच

मुंबईच्या सुरक्षेसाठी ५ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे.

CCTV

मुंबईत सध्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यात आणखी ५ हजार नवीन सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची भर पडणार आहेत. त्याचबरोबर नवीन इमारतींना देखील सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात येणार आहेत.आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी ११२ हा क्रमांक सुरू करण्यात येईल.पोलीस मोबाईल व्हॅन,बाईक तातडीने घटनास्थळी पोहोचेल.त्यासाठी नवीन १५०० व्हॅन व २२०० बाईक घेण्यात येणार आहेत.त्यासाठी ४०० कोटी रूपये खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत नियम २९३ अन्वये उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना त्यांनी वरील घोषणा केली. दरम्यान, मुंबईसह पुणे,नागपूर या शहरांतही सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

तर अहमदनगर येथे महिला व तिच्या पतीला मारहाणीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत आणि एकदंरीतच या प्रकरणाची चौकशी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक आरती सिंग व नगरच्या अतिरिक्त पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.तसेच मीरा-भाईंदरमधील माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधातील चौकशी ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.आपातकालीन यंत्रणेसाठी ११२ हा क्रमांक सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.