एकनाथ शिंदे छोटी नाहीतर मोठी आव्हानं स्वीकारतो; आदित्य ठाकरेंवर पलटवार

'काही लोक आम्हाला आव्हान देत आहेत. पण माझ्या सहकाऱ्यांना आधीच सांगितले आहे की, एकनाथ शिंदे अशी छोटी आव्हान स्विकारत नसून मोठी-मोठी आव्हानं स्विकारतो. जे सहा महिन्यांपूर्वी स्विकारले होते', अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

‘काही लोक आम्हाला आव्हान देत आहेत. पण माझ्या सहकाऱ्यांना आधीच सांगितले आहे की, एकनाथ शिंदे अशी छोटी आव्हान स्विकारत नसून मोठी-मोठी आव्हानं स्विकारतो. जे सहा महिन्यांपूर्वी स्विकारले होते’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोळी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी भाजप आणि शिंदे गटातल्या नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ()

“आम्ही संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलो आहे. आम्ही आयते आलेलो नसून, आयतं मिळालेलं नाही. मेहनत केली आहे. शाखाप्रमुखापासून बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरीत होऊन आम्ही शिवसेनेत आलो आहे. त्यामुळे कोणाला तुम्ही आव्हान देतात. आम्ही ही अशी आव्हान पेलत-पेलत इथपर्यंत पोहोचलो आहे. तसेच, लोकांच्या मनातले सरकार स्थापन केले आहे”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्या निशाणा साधला.

“काही लोक आम्हाला आव्हान देत आहेत. पण माझ्या सहकाऱ्यांना आधीच सांगितले आहे की, एकनाथ शिंदे अशी छोटी आव्हान स्विकारत नसून मोठी-मोठी आव्हानं स्विकारतो. जे सहा महिन्यांपूर्वी स्विकारले होते. त्यानंतर या राज्यात स्वत: मुख्यमंत्री व्हायचे म्हणून नाही तर, दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरून मतदान मागितले. या राज्यातल्या जनतेले आम्हाला निवडून दिले होते. त्यांची इच्छा शिवसेना व भाजपाचे सरकार व्हावे अशी होती. तसेच, तुम्हीही शिवसेना-भाजापाच्या युतीला मतदान केले. त्यानुसार, सरकार भाजपा व शिवसेनेच्या युतीचे व्हायला पाहिजे होते. पण 2019लाच ज्याची दुरूस्ती व्हायला पाहिजे होती, ती आम्ही केली आणि लोकांच्या मनातले सरकार स्थापन केले”, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले.

“काही लोक सकाळी उठले की, गद्दार, खोके एवढे दोनच शब्द बोलत असतात. त्यांच्याकडे तिसरा शब्दच नाही. पण त्यावर काही बोलणार नाही”, असा टोलाही यावेळी खासदार संजय राऊत यांना नाव न घेता लगावला.

“आपले सरकार आले म्हणूनच तुमची मागणी दोन पीलरमधील अंतर 120 मीटर व्हावी ही मागणी पूर्ण झाली. आम्ही अधिकाराचा वापर जनतेचे भले व्हावे यासाठीच करत आहोत. मला काम करायाचे आहे, तुमच्यासाठी काम करायचे असून सर्वसामन्यांसाठी काम करायचे आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. काही लोक बोलत आहेत, त्यांना बोलू द्या”, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

कोळी बांधवांचा कोस्टल रोडला विरोध नव्हता. फक्त दोन पिलरमध्ये अंतर वाढवण्याची मागणी होती. पूर्वी ६० फूट अंतराने काम होणार होतं. परंतु बोटींना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून हे अंतर १२० फूट ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. मागच्या सरकरला सामान्यांच्या प्रश्नांचं देणंघेणं नव्हतं म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आमचं सरकार जनतेच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार, असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.


हेही वाचा – मनसेकडून आदित्य ठाकरेंच्या वर्मावर बोट, आजोळचा उल्लेख करत थेट आव्हान