घरताज्या घडामोडीMumbai Zoo : मुंबईच्या प्राणिसंग्रहालयात ऑस्करचं स्वागत

Mumbai Zoo : मुंबईच्या प्राणिसंग्रहालयात ऑस्करचं स्वागत

Subscribe

मुंबईतील प्राणिसंग्रहालयात ऑस्कर नावाच्या पेग्विनचं स्वागत करण्यात आलंय. मुंबई प्राणिसंग्रहालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचा आज नामकरण सोहळा पार पडला असून त्याचं नाव ऑस्कर ठेवण्यात आलंय.

१९ ऑगस्ट २०२१ रोजी भायखळा येथील प्राणिसंग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या बाळाचे नाव ऑस्कर असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लामुळे एकूण संख्या आता नऊ झाली आहे. यामध्ये पाच नर आणि चार मादी आहेत. पेंग्विन पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. परंतु कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे राणीची बाग पर्यंटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

पेंग्विन आणि वाघाच्या बछड्याचे नामकरण

बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) व करिष्मा (मादी) यांनी १४ नोव्हेंबर २०२१ रोजी जन्म दिलेल्या मादी बछड्याचे नामकरण करण्यात आले असून तिचे नाव “वीरा” असे ठेवण्यात आले आहे. तर हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील मोल्ट (नर) व फ्लिपर (मादी )यांच्या जोडीने १८ ऑगस्ट २०२१ रोजी जन्म दिलेल्या पेग्विन नर पिल्लाचे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव “आँस्कर ” असे ठेवण्यात आले आहे. या नामकरणाची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दि. १८ जानेवारी २०२२ रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील थ्रीडी ऑडिटोरियम येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते केक कापून नामकरण झाल्याचे जाहीर करण्यात आले. याप्रसंगी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, डॉ. कोमल राऊळ उपस्थित होत्या.

- Advertisement -

महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, सुमारे १५ वर्षानंतर दि. १२ फेब्रुवारी २०२० रोजी औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन प्राणीसंग्रहालयातून बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर ) व करिष्मा ( मादी) मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयामध्ये आणण्यात आली.
वाघाकरिता नवीन तयार करण्यात आलेल्या प्रदर्शनीमध्ये नैसर्गिक अधिवास निर्मिती धबधबा, पारदर्शक काचेची प्रदर्शनी, अनुकूल लँण्डस्केप इत्यादी तयार करण्यात आले असून या अत्यंत अनुकूल अश्या प्रदर्शनीमध्ये या बंगाल वाघाच्या जोडीने एका मादी बछड्याला जन्म दिला आहे. वाघीण करिष्मा व बछडा “वीरा” सुखरूप असून बछडा आता दोन महिन्याचे झाले आहे. वाघीण करिष्मा तिच्या बछडयाची व्यवस्थित काळजी घेत असून बछड्याची उत्तम वाढ होत आहे.

” वीरा” सहा महिन्यांची होईपर्यंत तिला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून तिला जंताची औषधे व लसीकरण करण्यात येत आहे. पशुवैद्यकांच्या उपस्थितीत फक्त प्राणीपालास बछड्याजवळ जाण्याची परवानगी देण्यात आली असून तिला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, भायखळा येथील हम्बोल्ट पेग्विन कक्षातील डोनाल्ड (नर )व डेझी (मादी ) यांनी दि. ०१ मे २०२१ रोजी जन्म दिलेल्या नर पिल्लाचे नाव “ओरिओ ” असे ठेवण्यात आले होते, असेही महापौरांनी यावेळी सांगितले.


हेही वाचा : ९ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणांना मरेपर्यंत जन्मठेप, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -