घरमहाराष्ट्रमुंबईकरांना यंदा जास्त पगारवाढीची अपेक्षा

मुंबईकरांना यंदा जास्त पगारवाढीची अपेक्षा

Subscribe

आर्थिक राजधानी मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यंदा २० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा आहे. तर त्या तुलनेत दिल्ली-एनसीआर आणि बंगळूर येथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात फक्त ०-१०% वाढ होईल असे वाटते आहे.

आर्थिक राजधानी मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यंदा २० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा आहे. तर त्या तुलनेत दिल्ली-एनसीआर आणि बंगळूर येथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात फक्त ०-१०% वाढ होईल असे वाटते आहे. शाईनडॉटकॉम या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या जॉब पोर्टलने अलीकडेच केलेल्या पहिल्यावहिल्या उमेदवार-केंद्री अप्रेझल सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. एचआर किंवा कंपनीच्या दृष्टीकोनाऐवजी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर केंद्रित हे सर्वेक्षण आयटी, बँकिंग आणि फायनान्स, औद्योगिक उत्पादने, शिक्षण/प्रशिक्षण, एफएमसीजी सारख्या विविध उद्योगांतील व्यावसायिकांमध्ये करण्यात आले.

मुंबई, पुणे आणि चेन्नई यांसारख्या शहरात काम करणाऱ्या व्यावसायिकांना २०% पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. मुंबईतील सुमारे ३७% लोकांना २०% पेक्षा जास्त पगार वाढीची अपेक्षा आहे. तर पुणे आणि चेन्नई येथील ही आकडेवारी अनुक्रमे ३६% आणि ३८% आहे. भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणजे बंगळूर येथे २१% लोकांना त्यांच्या पगारात १०% पर्यंत वाढ होईल असे वाटते आहे. तर देशाची राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये २०% लोकांना कमी पगारवाढ होईल, असे वाटते आहे.

- Advertisement -

शाईनडॉटकॉमच्या सर्वेक्षणात निदर्शनास आलेली आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे मुंबईतील शिक्षण, प्रशिक्षण क्षेत्रातील तब्बल ६२% कर्मचारी २०% पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा करत आहेत. तर ऑटो क्षेत्रातील सुमारे ५६% कर्मचाऱ्यांनादेखील तितक्याच वाढीची अपेक्षा आहे. पुण्यातील ऑटो क्षेत्रातील ४८% आणि शिक्षण, प्रशिक्षण क्षेत्रातील ३८% कर्मचाऱ्यांना २०% पेक्षा जास्त वाढीची अपेक्षा आहे. या दोन्ही शहरांमध्ये बहुतांशी क्षेत्रात दमदार वाढ होत आहे आणि एकत्रितरित्या त्यांचे अप्रेझल सेंटीमेंट देशात सर्वात जास्त आहे.

पगारवाढीच्या अपेक्षांच्या क्षेत्रवार विश्लेषणातून हे स्पष्ट होते की बीएफएसआय आणि बीपीओ/केपीओ/आयटीईएस क्षेत्रातील व्यावसायिकांमधील अप्रेझल सेंटीमेंट सर्वात उच्च आहे. या क्षेत्रातील ३५% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना २०% पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा आहे. तंत्रज्ञानामधील प्रगती आणि इंटिग्रेशनच्या जोरावर वृद्धिंगत होत असलेल्या या क्षेत्रांमध्ये इतक्या उच्च अपेक्षा असणे यात आश्चर्यकारक असे काहीच नाही.

- Advertisement -

या सर्वेक्षणात सामील झालेले प्रतिसादकर्ते प्रामुख्याने मुंबई (१९.४९%), दिल्ली-एनसीआर (२०.८९%), बंगळूर (२०.८९%), हैदराबाद (१६.४३%), पुणे (९.३४%) आणि चेन्नई (११.६४%) सारख्या महानगरांमधील होते. वर नमूद केलेल्या निरीक्षणांमधून हे स्पष्ट होते की, भविष्यात दीर्घ काळ श्रेष्ठ प्रतिभा सांभाळण्यासाठी संस्थांना आपल्याकडील मानव संसाधनावर अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -