मुंबई, पुणे, नाशिकमध्ये बोचऱ्या थंडीचा अनुभव; राज्यात आणखी 8 दिवस थंडीचा कडाका कायम

Mumbaikars bring out sweaters as chilly days return india under cold wave dense fog temperature fall by 15.2 degree celsius

राज्यात मागील काही दिवसांपासून उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने थंडीचा तडाखा वाढतोय. यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. यात मुंबई, पुणे, नाशिकमध्ये नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव मिळत आहे. पुढील काही दिवसांत थंडीचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुढील 8 दिवस थंडीची लाट कायम राहण्याती शक्यता आहे.

मुंबईत मागील 24 तासांपासून हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. मुंबईत आठवड्याभरापासून तापमानात अचानक घट झाल्याचे पाहालया मिळत आहे. त्यामुळे मुंबईकर थंडीपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी स्वेटर आणि इतर उबदार कपड्यांचा आधार घेत असल्याचे दिसतेय. या बोचऱ्या थंडीमुळे मुंबईकरांना घर बसल्या काश्मीरचा फील घेता येतोय.

मुंबईत शनिवारी सकाळी किमान तापमान 15.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. यंदाच्या हिवाळी मोसमातील हे सर्वात कमी तापमान आहे. अंदाजानुसार, आज दिवसभर देखील असचं तापमान राहण्याचा अंदाज आहे. शहरात या आठवड्यात थंड वारे वाहत असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी हे मुंबईतील सुखद महिने म्हणून ओळखले जात आहे. दरम्यान रविवार आणि सोमवारी तापमान आणखी घसरू शकते असा अंदाज आहे.

मागील चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात कोकणात थंडीची लाट आली आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत तसेच परभणी, गोंदिया, अकोला, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतही थंडीचा कडाका कायम आहे.

पुणे, सातारा, सांगली, महाबळेश्वर, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातही किमान तापमानात घट झाली आहे. राज्यातील सकाळपासून दाट धुके पडत असून पुढील आठ ते दहा दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे.


मुंबईत 2 वर्षांनंतर टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात, पहाटेपासून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी