मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेच्या ‘या’ नऊ स्थानकांवर करता येणार इलेक्ट्रिक वाहन चार्ज

ही चार्जिंग सुविधा 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरु असणार आहे

mumbaikars good news electric vehicle charging facility at nine stations of central railway

मुंबई :  भारतात गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांनी मागणी मोठ्या प्रमाणात वाढतेय. इलेक्ट्रिक कार, मोटर सायलकला अनेकांची पसंती मिळतेय. मात्र भारतात अद्याप इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग सुविधा म्हणावी तशी नसल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. यात मुंबईतही इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधेसाठी आता मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. मध्य रेल्वेच्या नऊ स्थानकांवर आता वाहन चालकांसाठी चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. ज्यामुळे वाहन चालकांना रेल्वे स्टेशनवरचं आता वाहन चार्जिंग करता येणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा, परळ, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, भांडुप, कल्याण आणि पनवेल स्थानकांवर ही सुविधा दिली जाणार आहे.

दरम्यान वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यात अनेक उपक्रमही राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेने अनेक स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा दिली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना गती मिळणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी रेल्वे स्थानकांवरील ही चार्जिंग सुविधा परवडणारी, कार्यक्षम आणि विश्वासार्ह असेल. यात भारतीय रेल्वेने काही वर्षांत 100 टक्के विद्युतीकरण, विजेचा कमीतकमी वापर, सौर आणि पवन उर्जेसारख्या अक्षय्य उर्जेचा वापर करण्यावर भर दिला आहे. यात ईव्ही चार्जिंग पॉईंट्सची तरतुद हा भारतीय रेल्वेने घेतलेला हरित उपक्रम आहे.


वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राला नेमका काय होणार तोटा?