घरताज्या घडामोडीमुंबईतील रस्ते पुढच्या वर्षी खड्डेमुक्त होणार

मुंबईतील रस्ते पुढच्या वर्षी खड्डेमुक्त होणार

Subscribe

जीओ पॉलिमर, एम ६००, पेव्हर ब्लॉक, रॅपिड हार्डिंग क्रॉकिटचे नवीन तंत्रज्ञान

पावसाळा सुरू झाला की दरवर्षी खड्ड्यांची समस्या ऐरणीवर येते. खड्ड्यांवरून राजकारण पेटते. सामान्य माणूस मात्रया समस्येने बेजार होतो. मात्र आता मुंबई महापालिकेने खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान अवलंबले आहे. खड्डे मुक्त रस्त्यांसाठी जीओ पॉलिमर, एम ६००, पेव्हर ब्लॉक, रॅपिड हार्डिंग क्रॉकिट या चार तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र या चार तंत्रज्ञानांपैकी एका तंत्रज्ञानाला स्टॅग कमिटीने मंजुरी दिल्यानंतर त्या तंत्रज्ञानाचा वापर पुढील वर्षांपासून खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती उपायुक्त उल्हास महाले ( पायाभूत सुविधा) यांनी दिली. पालिकेने या चार तंत्रज्ञानांचा वापर करून पूर्व द्रुतगती उड्डाणपुलाखाली आणिक बस आगारानजीकच्या रस्त्यावर खड्डे बुजविण्याचा प्रयोग केला.

मुंबईत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सध्या ‘कोल्ड मिक्स’ या मटेरियलचा वापर करण्यात येतो. तसेच, काही ठिकाणी तर जुने पेव्हर ब्लॉक वापरून खड्डे बुजविण्यात येत आहेत. मात्र कधी कधी हे पेव्हर ब्लॉक नीटपणे बसविले नसल्यास व ‘कोल्ड मिक्स’चा दर्जा योग्य नसल्यास अथवा ते नीटपणे न वापरल्यास कोल्ड मिक्स उखडले व पुन्हा त्याच ठिकाणी खड्डा दिसून येतो. मात्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश दिल्याने पालिका प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे. या खड्ड्यांच्या समस्येवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर महापालिकेने आता खड्डे बुजविण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान अवलंबण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी जीओ पॉलिमर, एम ६००, पेव्हर ब्लॉक, रॅपिड हार्डिंग क्रॉकिट या तंत्रज्ञानाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार्‍या प्रयोगात मुंबई महापालिकेला एकही पैसा खर्च नाही, असेही महाले यांनी सांगितले. मुंबईत पालिका हद्दीत २०५५ किमीचे रस्ते आहेत. यामध्ये १ हजार ०३० किमी डांबरी तर १०५० किमीचे रस्ते काँक्रिटचे आहेत. यामधील डांबरी रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. डांबरातील ‘बिटुमन’च्या गुणधर्मामुळे पावसाचे पाणी संपर्कात आल्यामुळे खड्डे पडतात, असा दावा पालिकेने केला आहे. मात्र अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी, यंदा रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या चाचण्या सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पूर्व द्रुतगती मार्गाखालील दया शंकर चौक ते मुंबई पोर्ट ट्रस्ट टोल, पिलर क्र. ३३३ जवळ रॅपिड हार्डनिंग काँकिटचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. तर पिलर क्र. ३३४ जवळ एम-६० तंत्रज्ञान आणि दया शंकर चौकजवळ पेवर ब्लॉक व आणिक वडाळा मार्गाच्या भक्ती पार्क जंक्शनजवळ जिओ पॉलिमर तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिक सादर करण्यात आले.

जिओ पॉलिमर तंत्रज्ञानावर १ चौरस मीटरसाठी ५ हजारांचा खर्च येतो. या तंत्रज्ञानात खड्ड्याच्या जागीच मटेरियल तयार करून तातडीने खड्डा भरला जातो. सिमेंट रस्त्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. २ तासांत हे मटेरियल सुकल्यानंतर वाहतूक सुरू करता येते. ‘हेवी वेट’ वाहनांची वाहतूक असणार्‍या रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे. १ चौरस मीटर खड्डा भरण्यासाठी ५ हजार रुपयांचा खर्च येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -