(Munde Vs Bawankule) मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून पाच दिवस झाले तरी, राज्यात अद्याप नवे सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले असले तरी, मुख्यमंत्रिपदावर गाडे अडले होते. पण शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्याने आता भाजपा नेते फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या मंत्रिमंडळात तरुणाईला संधी देण्याबरोबरच भाजपाकडून जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. (BJP’s new strategy to hand over the post of state president to Pankaja Munde?)
विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल 230 जागा जिंकल्या. त्यात भाजपाला आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. या विजयाचे श्रेय भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना जात असल्याने मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. या मिळालेल्या यशाबरोबरच भाजपाची प्रतिमाही उंचावण्याचा मानस पक्षश्रेष्ठींचा असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच नव्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने तरुणाई जास्त संख्येने असेल. म्हणजे, मंत्रिमंडळातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त मंत्र्यांच वय 50पेक्षा कमी असू शकते, असे सांगण्यात येते.
हेही वाचा – SS UBT : सरन्यायाधीश चंद्रचूड आग लावून गेले आणि…, ठाकरे गटाचा पुन्हा एकदा निशाणा
पण त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे, मिलिंद नरोटे, समीर कुणावर, संजय कुटे, किशोर जोगरेवार, रमेश कराड, अतुल सावे, राजेश पवार, अभिमन्यू पवार, राम भदाणे, गिरीश महाजन, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, नितेश राणे, राजन नाईक, अतुल भातखळकर, अमीत साटम, राहुल कुल, महेश लांडगे, राधाकृष्ण विखे पाटील, सचिन कल्याण शेट्टी, गोपीचंद पडळकर, जयकुमार गोरे यांची नावेदेखील चर्चेत आहेत.
त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षाबाबतचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करू त्या जागी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, राज्यामध्ये जातीय संतुलन राखण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण, प्रदेशाध्यक्ष बंजारा अर्थात ओबीसी आणि मुंबई अध्यक्ष मराठा असे समीकरण भाजपाकडून बांधले जाऊ शकते, असा जाणकारांचा होरा आहे.
हेही वाचा – Politics : कपट-कारस्थाने चालूच आहेत, कारण…, ठाकरे गटाकडून भाजपा लक्ष्य
शिवाय, पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास देवेंद्र फडणवीस यांना तो अडसर ठरू शकतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्यासमोरच ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे,’ असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांना वारंवार डावलण्यात आल्याचे चर्चा होती. याबाबतची नाराजी त्यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली होती. जून 2022मध्ये राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी न मिळाल्यावरूनही त्यांनी ही खदखद व्यक्त केली होती. माझे नाव सतत चर्चेत आहे. पण अजूनही माझी पात्रता वाटत नसेल त्यामुळे मला मंत्रिपद दिले नसेल. जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा ते मंत्रिपद देतील. त्याबद्दल मला आक्षेप नाही, असे त्या म्हणाल्या होत्या, हे उल्लेखनीय.
सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे राज्यपातळीवरील राजकारणातून जवळपास पाच वर्षे पंकजा मुंडे काहीशा बाजूलाच पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना थेट लोकसभेत संधी देण्यात आली. पण तिथेही त्यांचा पराभव झाला. यावर्षी जुलैमध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्या विजयी झाल्या. मात्र तरीही, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश न करता, त्यांच्याकडे प्रदेशाध्यपदाची सूत्रे दिली जातील, असे सांगितले जाते. (Munde Vs Bawankule : BJP’s new strategy to hand over the post of state president to Pankaja Munde?)
हेही वाचा – Maharashtra Politics : बाळासाहेबांचे नाव घेऊ नका, मुख्यमंत्रिपदावरून संजय राऊतांचा शिंदेंना टोला