सस्ती दारू, महंगा तेल; मुनगंटीवार यांची टीका

‘तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल,’ अशी या सरकारची नीती असल्याची केली टीका

bjp leader sudhir mungantiwar says bjp was relax in mlc election

मुंबई – महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केले आहे. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली आहे.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल,’ अशी या सरकारची नीती आहे, असेही ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने लोकशाही मार्गाने सरकार निवडून येतात. त्या सरकारचा प्रत्येक निर्णय शेतकर्‍यांना समर्पित असतो. शोषित समाजाला समर्पित असतो. वंचित समाजाला समर्पित असतो. गोरगरिबांना समर्पित असतो. शेतमजुरांना समर्पित असतो; पण बेइमानीच्या आधारावर हे सरकार स्थापन झालेले आहे. जनतेने निवडून दिलेले हे सरकार नाही.