घरउत्तर महाराष्ट्रदर्ग्याच्या अतिक्रमण प्रकरणी महापालिका अ‍ॅक्शन मोडवर; ट्रस्टला सात दिवसात खुलासा करण्याची नोटीस

दर्ग्याच्या अतिक्रमण प्रकरणी महापालिका अ‍ॅक्शन मोडवर; ट्रस्टला सात दिवसात खुलासा करण्याची नोटीस

Subscribe

नाशिक : मुंबईमधील दर्ग्याच्या अतिक्रमणानंतर हिंदू हुंकार सभेत नाशिकमधील नवश्या गणपती मंदिराजवळील दर्ग्याच्या अतिक्रमणाचा प्रश्न चर्चेत आला आहे. हे अतिक्रमण काढण्यात यावे याकरीता हिंदू सभेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर नाशिक महापालिका प्रशासन अर्लट मोडवर आले असून आता या दर्ग्याला नाशिक महापालिका प्रशासनाने नोटीस पाठवली असून सात दिवसात खुलासा न केल्यास पालिका बुलडोझर चालवणार असल्याचा इशारा या नोटिसीद्वारे संबंधित दर्गा प्रशासनास देण्यात आला आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर सभा झाली. यावेळी राज ठाकरे सभेत माहिम आणि सांगलीमधील कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर राज्यभरातील अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा हा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतो आहे. मुंबई, सांगली पाठोपाठ नाशिकमधील दर्ग्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू हुंकार सभेत शहरातील अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी महापालिका प्रशासनाने संबंधित ट्रस्टला नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

गंगापूररोडवरील प्रसिद्ध नवश्या गणपतीला लागूनच असलेला दर्ग्याचे अतिक्रमण असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केला होता. संबधित जागेची पाहणी केली जाईल आणि अनाधिकृत बांधकाम असेल तर नियमाप्रमाणे ते हटवले जाईल असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहे. यानंतर लगेचच महापालिका प्रशासन कामाला लागले असून महापालिकेने दर्गेला नोटीस पाठविण्यात आली आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेच्या नगररचना विभागाने नोटीस काढली आहे. दर्गेच्या बाजूला असलेले पत्र्याचे शेड, पक्के बांधकाम बेकायदेशीर असल्याचा प्रशासनाचा नोटीसमध्ये उल्लेख केला असून सात दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे. सात दिवसात खुलासा न केल्यास पालिका बुलडोझर चालवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -