घरमहाराष्ट्रखासगी हॉस्पिटलवर महापालिकेचे ऑडिटर

खासगी हॉस्पिटलवर महापालिकेचे ऑडिटर

Subscribe

समन्वयाची जबाबदारी पाच सनदी अधिकार्‍यांवर

करोनावरील इलाजासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांच्या लुटीचे प्रकार समोर आल्यावर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कडक पाऊल उचलले आहे. मुंबईतील खाजगी हॉस्पिटलवर महापालिकेच्या दोन ऑडिटर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या हॉस्पिटलच्या समन्वयाची जबाबदारी पाच सनदी अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांना देण्यात आलेले बिल जास्त असल्याची तक्रार रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्यास महापालिकेचे ऑडिटर त्या बिलांची छाननी करणार आहेत. त्यात काही गैरप्रकार असल्यास संबंधित हॉस्पिटलवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. तसेच महापालिकेसह खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेडचे योग्यप्रकारे वापर रुग्णांसाठी होतो किंवा नाही, यावर देखील या ऑडिटर्समार्फत महापालिका प्रशासनाचे लक्ष असणार आहे.

मुंबईतील खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या खासगी हॉस्पिटलचा दौरा केल्यानंतर अनेक खासगी हॉस्पिटलनेे ८० टक्के बेड राज्य शासनाच्या ताब्यात न देता केवळ ४० ते ५० टक्के बेड करोना रुग्णांसाठी ठेवल्याचे उघड झाले होते. तसेच येथे दाखल होणार्‍या रुग्णांकडून शासन निर्देशानुसार दरांची आकारणी न करता भरमसाठ बिल उखळले जात असल्याच्या अनेक तक्रारीही आल्या होत्या. त्यामुळे या हॉस्पिटलवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ऑडिटर नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

खासगी रुग्णालयामधील खाटांचे वितरण सामान्यातील सामान्य व्यक्तीला अधिक प्रभावीपणे होण्यासह या वैद्यकीय सेवा सुविधा रुग्णांना अधिक परिणामकारकपणे मिळाव्यात, यासाठी सुयोग्य समन्वय साधण्यासाठी ५ सनदी अधिकार्‍यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे. यापैकी तीन सनदी अधिकार्‍यांकडे गेल्याच महिन्यात मुंबईतील महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांसह व शासकीय रुग्णालयांच्या समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा सुयोग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या ऑडिटर खात्यातील प्रत्येकी दोन अधिकार्‍यांची नियुक्तीही प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी करण्यात आली आहे. तसेच एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय देखील महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयाकरिता ज्या सनदी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकार्‍यांकडे ईमेलद्वारे थेटपणे आपली तक्रार नोंदविता येणार आहे.

- Advertisement -

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत सांगितले की, हा मोठा बदल असून करोनाच्या मुख्य नियंत्रण कक्षाचे विकेंद्रीकरण करून विभाग स्तरावरच वॉर रुम तयार करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे १९१६ वर भार हलका होईल आणि नागरिकांना विभागस्तरावरच रुग्णालयातील खाटांचा प्रश्न असो वा रुग्णवाहिकेचा प्रश्न असो तो सुटला जाईल. खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा ताब्यात आल्या आहेत; पण त्यांचा वापर योग्यप्रकारे करण्यासाठी सनदी अधिकार्‍यांना समन्वयक म्हणून नेमताना प्रत्येकी दोन ऑडिटर्सही नेमले आहेत.

खासगी हॉस्पिटल समन्वयासाठी नेमलेले सनदी अधिकारी व लेखा परीक्षक अधिकारी आयएएस मदन नागरगोजे :
यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटल, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल, भाटिया हॉस्पिटल, कॉनवेस्ट व मंजुळा एस बदानी जैन हॉस्पिटलआणि एस.आर.सी.सी. हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांच्या अनुषंगाने काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास ईमेल पत्त्यावर करू शकता. [email protected] या रुग्णालयांसाठी नेमलेले लेखापरीक्षक अधिकारी : संजय जाधव, मोहन पुकळे, प्रदीप वाघ, विजय घायवंत, राजेश शेट्टीगर, विजय नलावडे, सोमनाथ मदगे, मंदार शेळके, अंशीराम गोरे, सुदय हरियाण, राजेश गंगावणे, संदीप साळवी, शैलेश करंदीकर, नवलसिंग नाईक, राहुल गोपनर

आयएएस अजित पाटील
अजित पाटील यांच्याकडे मसिना रुग्णालय, वोक्हार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, के. जे. सोमय्या रुग्णालय, गुरू नानक इस्पितळ आणि पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल यांचे दायित्व सोपविण्यात आले आहे.
त्यांचा ईमेल : [email protected] या रुग्णालयांसाठी नेमलेले लेखापरीक्षक अधिकारी : अनिल हरवंडे, अनंत ठाकूर, संजय पिंगळे, नितीन बायेस, सुजीत पाटणकर, स्वप्निल उदरे, शशिकांत टिटकारे, सागर सावडेकर, श्रीकृष्ण चांदोरकर, श्रीकांत बाटेकर, अनिरुध्द येवले, निलेश अरडे, केदार बागडे

आयएएस राधाकृष्णन
राधाकृष्णन यांच्याकडे एस. एल. रहेजा रुग्णालय, लीलावती इस्पितळ, होली फॅमिली रुग्णालय, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, बी.एस.इ.एस. रुग्णालय, शुश्रुषा रुग्णालय आणि होली स्पिरिट हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ई-मेल :- [email protected] या रुग्णालयांसाठी नेमलेले लेखापरीक्षक अधिकारी : शंकर गंगासरे,अवधुत खडपे, अविनाश गावडे, निलेश पागधरे, गणेश बुध्दवंत, उदय राजपूत, सागर चव्हाण, गितेश हळदणकर, विल्यम कोरेला, अजय पांडे, संजय सराफ, महिंद्र गायकवाड, प्रशांत देशमुख, दिगंबर शिंदे

आयएएस सुशील खोडवेकर
सुशील खोडवेकर यांच्याकडे कोहिनूर रुग्णालय, हिंदू सभा रुग्णालय, एस.आर. व्ही. चेंबूर रुग्णालय, गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, एल. एच. हिरानंदानी इस्पितळ, सुराणा सेठिया रुग्णालय आणि फोर्टीस रुग्णालय या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ई-मेल : [email protected] या रुग्णालयांसाठी नेमलेले लेखापरीक्षक अधिकारी : दिपक घारगे, जहिरुद्दीन काझी, प्रसाद गुप्ता, देवेंद्र बोले, अनिल केणी, संदीप वरवडेकर, राजेंद्र पवार, प्रकाश परमार, सुनील मालवाडकर, विठ्ठल भांगारे, प्रविण पाटील, दत्तात्रय ठाकूर, सुनील खर्चे, अजयकुमार खाचणे,

आयएएस प्रशांत नारनवरे
प्रशांत नारनवरे यांच्याकडे करूणा रुग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, नानावटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय आणि अपेक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांविषयी काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास त्यासाठीचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे आहे : [email protected] या रुग्णालयांसाठी नेमलेले लेखापरीक्षक अधिकारी : संजय रणधीर, विलास सरोदे, अमित माने, सचिन पवार, दिपक मालपाठक, श्रीराम चौधरी, रामचंद्र खोबरेकर, सुयोग कुलकर्णी, राजेंद्रकुमार भिमकर, अरविंदबाबू गायकवाड, योगेश महाजन, मिलिंद मोर्ये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -