घरमहाराष्ट्रस्मार्ट सिटीसाठी सांस्कृतिक केंद्रांचा विकास होणं गरजेचं - आयुक्त हर्डीकर

स्मार्ट सिटीसाठी सांस्कृतिक केंद्रांचा विकास होणं गरजेचं – आयुक्त हर्डीकर

Subscribe

पिंपरी-चिंचवड शहरातील लोप पावणाऱ्या संस्कृतीचा विकास झाल्यास शहर अधिक वेगाने स्मार्ट होईल, म्हणून स्मार्ट सिटीसाठी सांस्कृतिक केंद्रांचा विकास होणं गरजेचं आहे, असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी नियोजन, तंत्रज्ञान आणि नागरिक या त्रिसूत्रीवर काम करावे लागणार आहे. त्यातच शहरातील लोप पावणाऱ्या संस्कृतीचा विकास झाल्यास शहर अधिक वेगाने स्मार्ट होईल, म्हणून स्मार्ट सिटीसाठी सांस्कृतिक केंद्रांचा विकास होणं गरजेचं आहे, असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड शहरात इंद्रायणी, मुळा आणि पवना या तीन नद्यांच्या किनारी वसलेलं शहर आहे. त्यामुळे नद्यांची स्वच्छता आणि त्यांचा विकास करणं ही देखील काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा – स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी खारफुटीवर कुर्‍हाड

- Advertisement -

‘एकविसावे शतक हे शहरीकरणाचे शतक’

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, प्रशासन, राजकीय नेतेमंडळी आणि नागरिक यांच्यामध्ये दिवसेंदिवस दरी पडत चालली आहे. ही दरी कमी करण्यासाठी नागरिकांनी योग्य नेत्यांची निवड करून त्यांच्याकडून प्रशासनाच्या मदतीने कामे करून घ्यायला हवीत. शहराच्या सुधारणेत नागरिकांचा सहभाग वाढायला हवा. एकविसावे शतक हे शहरीकरणाचे शतक आहे. या शतकात सुमारे ८० टक्के जनता शहरात वास्तव्यास येणार आहे. त्याचा देखील विचार स्मार्ट शहराच्या आराखड्यात व्हायला हवा. शहराच्या विकासाचं प्लॅनिंग नागरिकांसोबत बसून त्यांच्याशी चर्चा करून करायला हवं. त्यातून नागरिकांच्या नवीन संकल्पना पुढे येतील आणि त्या संकल्पना राबविताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. सध्या चार भिंतींमध्ये शहराच्या विकासाचं नियोजन केलं जात असल्याने अनेक समस्या तयार होत आहेत.


हेही वाचा – ठाणे शहर म्हणजे ९४७ खड्ड्यांची ‘स्मार्ट सिटी’!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -