घरमहाराष्ट्रमुंबई अद्यापही तिसऱ्या स्तरात मध्येच महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची माहिती

मुंबई अद्यापही तिसऱ्या स्तरात मध्येच महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची माहिती

Subscribe

लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार?

शुक्रवारी राज्यातील जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि व्याप्त खाटांची संख्या याची आठवड्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट घसरला असला तरी मुंबई अद्यापही स्तर ३ मध्येच आहे. पुढील आठवड्यात मुंबईला स्तर-2 मध्ये आणण्यासाठी विचार केला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. पॉझिटिव्हिटी रेट हा पुढील आठवड्यात 2 ते 2.5 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी झाला तर नक्कीच मुंबई स्तर-2 मध्ये आणण्याचा विचार करून आणखी नियमांमध्ये शिथितला आणली जाईल.

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा मागील आठवड्यात 4.40 होता. या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट घटून 3.79 टक्के झाला आहे. मात्र, आजही मुंबईत 600 ते 700 कोरोना रुग्ण नव्याने आढळत आहे. ही संख्या 500 पेक्षा कमी व्हावी. जर मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट एक ते दीड झाला तर आपण मुंबई कोरोनाच्या परिस्थितीबाबत कंट्रोलमध्ये आली असे म्हणू शकतो. त्यामुळे लेव्हल 2 बाबत पुढच्या आठवड्यात स्थिती सुधारल्यानंतर विचार करू, असे आयुक्त चहल यांनी सांगितले. त्यामुळे मुंबई लेव्हल 2 मध्ये आल्यास अनेक बाबतीत शिथिलता मिळेल.

- Advertisement -

लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार?

स्तर-2 मध्ये मुंबई आपण आणली तर नक्कीच सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबाबत सुद्धा विचार केला जाईल. लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू करतानासुद्धा मागच्या वेळी सारखं टप्प्याटप्प्याने लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा विचार असेल. सुरुवातीला आधी महिला वर्गासाठी लोकल सेवा सुरू करू, मग इतरांसाठी लोकलचा विचार होईल, जेणेकरुन गर्दी होणार नाही. पण त्याआधी मुंबई स्तर-2 मध्ये येण्यासाठी आणखी परिस्थिती सुधारण्याची गरज आहे, त्यानंतर हे निर्णय घेतले जातील’, असे आयुक्त इकबाल सिंह चहल लोकलबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -