घरAssembly Battle 2022महापालिकेकडून १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया; ‘कार्बन फुटप्रिन्ट’मध्ये २० टक्के घट करणार

महापालिकेकडून १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया; ‘कार्बन फुटप्रिन्ट’मध्ये २० टक्के घट करणार

Subscribe

मुंबई महापालिका घनकचरा खात्याचे लक्ष्य, घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या ‘व्हिजन - २०३०’चा मंत्री शुभारंभ

“पर्यावरणपूरक विकास साध्य करण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. घनकचरा खात्याच्या सततच्या प्रयत्नांमुळेच मुंबईत दररोज निर्माण होणारा १० हजार मेट्रिक टन कचरा आता ६ हजार मेट्रिक टनावर आला आहे. त्यामुळे घनकचरा खात्याने १००% कच-यावर प्रक्रिया करण्याबरोबरच ‘कार्बन फुटप्रिन्ट’मध्ये २०% घट करण्यासाठी ठेवलेले उद्दिष्ट लवकरच साध्य होईल, असा आत्मविश्वास राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी ‘मुंबई महापालिका घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या ‘व्हिजन – २०३०’ चा शुभारंभ मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा खात्याने मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण १० हजार मेट्रिक टनवरून ६ हजार मेट्रिक टनावर आणल्याने मंत्री आदित्य ठाकरे यांनी घनकचरा खात्याचे विशेष कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या ‘व्हिजन – २०३०’ अंतर्गत १०० टक्के कच-यावर प्रक्रिया करणे, ‘कार्बन फुटप्रिन्ट’मध्ये २० टक्के घट साध्य करणे, कचरा विकेंद्रीकरण दुप्पट करण्यासह अधिक प्रभावी करणे, प्रभावी मनुष्यबळ व्यवस्थापन साध्य करणे आणि शौचालयांची संख्या वाढविणे इत्यादी लक्ष्य घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या ‘व्हिजन – २०३०’ मध्ये निर्धारित करण्यात आली आहेत.

- Advertisement -

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी, त्यांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे सध्या करण्यात येत असलेल्या कार्यांचा संक्षिप्त आढावा घेतला. तसेच ‘व्हिजन – २०३०’ बाबत देखील माहिती दिली. यानंतर घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या उप आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे ‘व्हिजन – २०३०’ बाबत उपस्थितांना अवगत केले. यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘व्हिजन – २०३०’ ची सविस्तर माहिती देणा-या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासह दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने ‘क्यू आर कोड’ कार्यान्वित करुन ‘व्हिजन – २०३०’ चा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरीस घन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता भारत तोरणे यांनी आभार प्रदर्शन केले.


एलॉन मस्क यांनी 200 कर्मचाऱ्यांची एकाच वेळी केली हकालपट्टी, कारण काय तर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -