घरताज्या घडामोडीमराठी फलक न लावणाऱ्या हॉटेल्सवर पालिकेची कारवाई, हायकोर्टाने फटकारलं

मराठी फलक न लावणाऱ्या हॉटेल्सवर पालिकेची कारवाई, हायकोर्टाने फटकारलं

Subscribe

मराठी फलक न लावणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर मुंबई महापालिकेने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईपासून मुंबई उच्च न्यायालयानेदेखील दिलासा देण्यास नकार दिला आहे. मराठीत फलक लावण्यासाठी काही दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी याचिका इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट्स असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आज याच याचिकेवर सुनावणी पार पडली. ही सुनावणी न्या. आर.डी. धानुका आणि न्या. एम.जी. सेवलीकर यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाने संघटनेला ताताडीचा दिलासा देण्यास नकार देत ही सुनावणी पुढील ८ जुलै रोजी ठेवली आहे. मुंबई महापालिकेने शहरातील सर्व दुकाने आणि आस्थापनांना ३१ मे पर्यंत मराठी फलक लावण्याची मुदत दिली. संघटनेने पालिकेने दिलेल्या ३१ मे पर्यंतच्या मुदतीच्या वैधतेलाच उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

- Advertisement -

फलकावरील भाषा, फॉन्टचा आकार आणि अन्य संबंधित बाबींची पूर्तता ३१ मे पर्यंत पूर्ण करणे शक्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे होते. त्यामुळे या याचिकेवर उत्तर देण्यासाठी पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाकडून वेळ मागितली. मराठी फलक लावण्यासंदर्भात नवीन बाबी पालिकेने महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापने कायद्याच्या कलम ३६ अंतर्गत विहित केल्या आहेत.


हेही वाचा : राज ठाकरेंच्या शस्त्रक्रियेनंतर ‘शिवतीर्था’वर भेटीसाठी रिघ, आमदार सदा सरवणकरांनी घेतली सदिच्छा भेट

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -