घरताज्या घडामोडीमहापालिकेचे ग्लोबल टेंडर रद्द, मात्र मुंबईकरांना स्पुतनिक लसीचा डोस मिळण्याची आशा पल्लवीत

महापालिकेचे ग्लोबल टेंडर रद्द, मात्र मुंबईकरांना स्पुतनिक लसीचा डोस मिळण्याची आशा पल्लवीत

Subscribe

मुदतीनंतर ९ पुरवठादार कंपन्यांनी महापालिकेला कागदपत्र पाठवले नाहीत.

मुंबईकरांचे मोफत लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेने पुढे येऊन लस खरेदी करता ग्लोबल टेंडर काढले होते. परंतु हे ग्लोबल टेंडर रद्द करण्यात आले आहे. ग्लोबल टेंडर काढल्यावर ९ लस पुरवठादार कंपन्यांनी प्रतिसाद दाखवला होता. परंतु कागदपत्रांच्या पुर्तते अभावी ९ कंपन्या अपात्र ठरल्या आहेत यामध्ये विशेषता म्हटले होते की, वॅक्सिन बनवणारी कंपन्यांनी प्रतिसाद दाखवला नाही परंतु कोरोना लस पुरवठादार होते. प्रत्यक्ष लस उत्पादित करणाऱ्या कंपन्या सामील नसल्यामुळे लस पुरवठादार आणि लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांच्यातील संबंध पडताळून पाहणे आवश्यक होते. जेणेकरुन आपण दिलेली मुदतीत सुरळीतपणे लस पुरवठा होईल याची खात्री पटणे गरजेचे होते. असे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

दरम्यान महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुढे म्हटले आहे की, लस पुरवठादार असलेल्या कंपन्या त्या नेमक्या किती दिवसांत लस पुरवठा करणार आहेत? किती संख्येने लस पुरवठा करणार? किती रक्कम द्यावी लागणार? या सगळ्या अटी शर्थी हे चार मुख्य पैलू होते. यामुळे यावर बारीक लक्ष देऊन पाठपुरावा केला होता. मुदतीनंतर ९ पुरवठादार कंपन्यांनी महापालिकेला कागदपत्र पाठवले नाहीत. महापालिकेने युद्धपातळीवर पुरवठादार कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी केली. यामध्ये एकही पुरवठा दार संपुर्ण कागदपत्रांच्या पुर्तते अभावी पात्र ठरु शकले नाहीत. यामुळे ग्लोबल टेंडर अपात्र ठरले असल्याचे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईकरांना स्पुतनिक लस मिळण्याच्या अशा पल्लवीत

मुंबई महानगपालिका पुढे प्रयत्न करत आहे. यामुळे पालिकेने कोरोना प्रतिबंधक लस साठा करण्याचा प्रयत्न सुरु ठेवले आहेत. प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलारसू यांनी स्पुतनिक या लसीचे वितरक डॉ. रेड्डीज या लॅबोरेटरीजशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर स्पुतनिक लसीचा साठा मुंबई महानगरपालिकेला मिळेल अशी आशा असल्याचे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. डॉ.रेड्डीजकडून जून ते जूलैमध्ये स्पुतनिक लसींचा साठा देण्याची तयारी दाखवली आहे. म्हणून स्पुतनिक लसीचे शीतगृहाच्या निकषानुसार चाचणी सुरु केली आहे. जूलै आणि ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात लसीचा साठा मिळण्याची शक्यता आहे. पुढील १० दिवसांत डॉ.रेड्डीजशी चर्चा होणार असल्याची माहिती मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -