घरताज्या घडामोडीपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना नगरसेविकेच्या नातेवाइकांनी केली मारहाण!

पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना नगरसेविकेच्या नातेवाइकांनी केली मारहाण!

Subscribe

औषध फवारणी करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांना नगरमध्ये मारहाण केल्याच घटना समोर आली आहे. सध्या जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महापालिकेने शहरात औषध फवारणीचे काम हाती घेतले आहे. बुधवारी रात्री उशिरा नागापूर परिसरात फवारणीचे काम करणाऱ्या महापालिकेच्या दोन स्वच्छता निरीक्षकांना नगरसेविकेच्या नातेवाइकांकडून मारहाण करण्यात आली. मारहाणीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात निलेश भाकरे आणि अन्य सात-आठ जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडलं?

जगभर पसरलेला कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून शहरात परिसर निर्जुंतीकरण करण्यासाठी औषध फवारणी सुरू आहे. आरोग्य विभागातील पथकामार्फत हे काम सुरू असून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत हे काम सुरू असते. बुधवारी रात्री नागापूर गावठाण परिसरात आरोग्य विभागाकडून औषध फवारणीचे काम सुरू होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास निलेश भाकरे आणि त्यांच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी आम्ही सांगू तशीच फवारणी करायची, आम्ही सांगितले तिथेच फवारणी करायची, असे म्हणत फवारणी करणाऱ्यांना दमदाटी केली. यावेळी तिथे उपस्थित असलेले महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ, अविनाश हंस यांनी भाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्वांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केली. यात दोघांच्या डोक्याला मार लागला असून जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ यांच्या तक्रारीवरून निलेश भाकरे आणि अन्य लोकांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचविण्याठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्यांवर हल्ले केले जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हेही वाचा – मरकजमध्ये सहभागी झालेल्या ३२ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -