घरमहाराष्ट्रमनपा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य

मनपा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Subscribe

राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या बाबत विविध चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षामुळे जवळपास 14 महापालिकांच्या निवडणुका या खोळंबल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या राज्यात 23 महानगरपालिकांमध्ये नगरसेवक हे पद रिक्त असल्याने प्रशासक हे संपूर्ण पालिकेचा कारभार पाहत आहेत. दरवेळी सत्ताधारी हे निवडणुकांबाबत वेगवेगळे भाकीत करत आहेत, ज्यामुळे नेमक्या निवडणुका कधी होणार, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. आज (ता. 15 मे) पालिकेच्या निवडणुका या आणखी लांबणीवर म्हणजेच साधारणतः 2024 मध्ये होण्याच्या शक्यता असल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या. पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महापालिकेच्या निवडणुका या लवकरच होणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – BMC Election: मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? ‘हे’ आहे कारण

- Advertisement -

आज देवेंद्र फडणवीस यांनी पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मनपा निवडणुकांच्याबाबत बोलताना म्हंटले की, राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, असे वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनपा निवडणुकांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा केल्या जाऊ लागल्या आहेत. (Municipal elections likely to be held in October-November – Devendra Fadnavis)

गेल्या वर्षभरात राज्यात अनेक धक्कादायक अशा राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. सध्या देशात जातीय वादाच्या मुद्द्यामुळे भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती होत आहे. तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे गटासाठी जनतेमध्ये सहानुभूतीपर वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी देखील मनपा निवडणुका या पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

- Advertisement -

भाजपचे फोडाफोडीचे राजकारण हे सामान्य माणसाला देखील कळून चुकलेले आहे. त्याचा परिणाम हा कर्नाटक निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आहे. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असताना देखील 2019 मध्ये भाजपने जेडीएसला हाताशी धरून काँग्रेसची सत्ता पाडत स्वतःची सत्ता आणली. ज्याचा धडा कन्नडीगांनी भाजपला यंदाच्या निवडणुकीत शिकवला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अगदी हीच परिस्थिती महाराष्ट्रातही निर्माण होऊ नये, म्हणून महाराष्ट्रातील निवडणुका या आणखी काही कालावधीनंतर घेण्यात येऊ शकतात, असेही बोलले जात आहे.

मात्र आता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नेमक्या या सरकारला मनपा निवडणुका घ्यायच्या आहेत की नाही? महानगरपालिकेचा कारभार आणूखी किती महिने प्रशासक पाहणार? महानगरपालिकेतील प्रभागांना नगरसेवक मिळणार की नाही? मनपा निवडणुकीकरिता मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार की नाही, यांसारखे अनेक प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

पक्षांतर करण्याच्या तयारीत
महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जून 2022 ला आले. या सत्ता बदलावरुन सर्वोच्च न्यायालयात वाद सुरु होता. या संघर्षामुळे राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या होत्या. बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -