घरCORONA UPDATEटेलिग्रामच्या माध्यमातून पालिका शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात

टेलिग्रामच्या माध्यमातून पालिका शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात

Subscribe

मुख्याध्यापक आणि शिक्षकांना झूम, टेलिग्राम अँप डाउनलोड करुन त्या वापरण्याचे आदेश देत त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कात कनेक्ट राहावे, अशा सूचना दिल्या आहेत.

पालिकेच्या पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन शिक्षण देण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यानी शाळांना दिल्या आहेत. मुख्याध्यापक आणि शिक्षकांना झूम, टेलिग्राम अँप डाउनलोड करुन त्या वापरण्याचे आदेश देत त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कात कनेक्ट राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे पालिका शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना हे कसे जमेल असा सवाल शिक्षक संघटनांनी केला आहे.

पालिका शाळांतील शिक्षक-मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांशी मोबाईल व ऑनलाईन माध्यमातून संपर्कात राहावे. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रत्येक शाळेने दररोज किमान चार तासिकांचे नियमित वेळापत्रक तयार करून विद्याथ्यांना ऑनलाईन अध्ययन-अध्यापन करून त्यांचे मूल्यमापन करावे, अध्यापनात पीपीटी, युटयुब यासारख्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे. तसेच विविध शैक्षणिक एपचा वापर करावा. शिक्षक मुख्याध्यापकांनी दररोज केलेल्या कामाची नोंद ठेवावी व व्हाट्सएप, टेलिग्राम, मेल, गुगल फॉर्म लिंक आदी माध्यमातून सादर करावी. शिक्षक – मुख्याध्यापक यांनी आपल्या मोबाईल मध्ये टेलिग्राम एप डाऊनलोड करून इयत्ता निहाय ग्रुपमध्ये सहभागी व्हावे, त्यातील शैक्षणिक माहिती व आवश्यक अन्य सूचना करिता “mcgmedu” हे चॅनेल सबस्क्राईब किंवा जॉईन करावे, अशा सूचना शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी काढलेल्या परिपत्रकातून दिल्या आहेत.

बहुतांश विद्यार्थी आणि शिक्षकही गावी गेले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी रेड झोन आहे. अशा कोरोनाच्या वातावरणात विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास कसा होणार? आणि प्रत्येक पालकांकडे स्मार्ट मोबाइल आहे का याचाही विचार पालिकेने करायला हवा होता. त्यामुळे पालिका शिक्षण विभाग केवळ कागद रंगवण्याचे काम करत आहे. 
– जालींदर सरोदे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -