घरमहाराष्ट्रपुणेबाळासाहेबांचे नातू असाल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, मुरलीधर जाधवांचे...

बाळासाहेबांचे नातू असाल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, मुरलीधर जाधवांचे आव्हान

Subscribe

बंडखोर खासदारा धैर्यशील माने यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक झाले असून धैर्यशील मानेंच्या कोल्हापूरमधील रुईकर कॉलनीतल्या निवासस्थानावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला. मोर्चाच्या प्रारंभी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी धैर्यशील माने यांच्यावर टीका केली. बाळासाहेब माने यांचे नातू असाल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे आव्हान त्यांनी धैर्यशील माने यांना दिले.

यावेळी 1 शिवसैनिक 100 जणांना भारी असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी कितीही बंदोबस्त लावला तरी आम्ही निवासस्थानी घुसणार असल्याचे त्यांनी सांगीतले. माने गटाने दोनवेळा गद्दारी केली आहे. यांची लायकी नव्हती, तरीही उद्धव ठाकरेंनी पाठीवर थाप मारली. पदरचे पैसे खर्च करून निवडून आणले. दुसऱ्या गटात गेले हीच गद्दारी आहे. गद्दाराला क्षमा नाही, असे  मुरलीधर जाधव म्हणाले. उद्धव ठाकरेंशी बेईमानी आणि गद्दारी केल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

- Advertisement -

शिवसैनिकांचे खासदारांना प्रश्न –

दरम्यान आपला गट अडगळीत पडला असताना उद्धव साहेबांनी आपल्याला लोकसभेत पाठवलं, प्रवक्ते पद दिले. मातोश्रीवर जेव्हा जेव्हा गेला तेव्हा उद्धव साहेबांनी सन्मान दिला, ओ खासदार सांगा उद्धवसाहेबांचे काय चुकले? हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिकांनी फुटक्या कवडीची अपेक्षा न करता स्वत:च्या घराती भाकरी बांधून आपल्या विजयासाठी जीवाचे रान केले, ओ खासदार सांगा शिवसैनिकांचे काय चुकले? अशी विचारणा शिवसैनिकांनी खासदार धैर्यशील माने यांना केली.

- Advertisement -

मोर्चाला विरोध न करण्याचे खासदार मानेंचे आवाहन –

बंडखोर खासदार धैर्यशील माने यांनी मोर्चाला विरोध न करण्याचे आवाहन सोशल मीडियातून केले होते. शिवसेनचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळे नेमके हे का घडले? कशामुळे घडले? यासाठी त्यांचा होणार आक्रोश व संवेदना मी शिवसैनिक म्हणून समजू शकतो. याच उत्तर घेण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा विरोध होता कामा नये, असे  आवाहन त्यांनी केले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -