घरताज्या घडामोडीधक्कादायक! माथेरानमध्ये आधी प्रेयसीची केली निर्घृण हत्या, अन् शिर घेऊन प्रियकर फरार

धक्कादायक! माथेरानमध्ये आधी प्रेयसीची केली निर्घृण हत्या, अन् शिर घेऊन प्रियकर फरार

Subscribe

पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान मध्ये एक महीला पर्यटकाची हत्या करून सोबत असलेल्या प्रियकराने त्या महीलेचे मुंडके कापून माथेरान मधुन पोबारा केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील प्राथमिक माहितीच्या आधारे सदर अनोळखी महीला जेमतेम वय २७ वर्षाच्या आसपास असल्याचे समजते.सदर महीला आपल्या प्रियकरासोबत दि.११ रोजी संध्याकाळच्या सुमारास माथेरानमध्ये आल्याचे सांगितले जात आहे. घटनेतील जोडपे माथेरान मधील इंदीरा गांधी नगर येथे खासगी लॉजमध्ये राहिले होते.

शनिवारच्या रात्री या महीलेसोबत असलेल्या व्यक्तीने या महीलेचा गळा चिरून तिला विवस्त्र अवस्थेत पलंगाखाली ठेवून तिचे मुंडके घेऊन पळ काढला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सदर घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर तसेच कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी व्ही.पी.लगारे तसेच कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पत्की यांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा तपास करीत आहेत.

- Advertisement -

या मृत महीलेचे आरोपीने शिरसोबत घेऊन गेल्याने घटनास्थळी फक्त धड असल्यामुळे तिची ओळख पटविण्यासाठी पोलीसांसमोर अनेक अडचणी येत आहे.सदर घटनेतील आरोपीने आपली ओळख लपवण्याचा देखील प्रयत्न केला असुन लॉजच्या नोंद वहीत महीलेचे रुबिना बेन व सोबत असलेल्या व्यक्तीचे अमजद खान अशी खोटी माहिती भरली असल्याचे पोलिसांना दिसून येत आहे.शनिवार रविवार या विकेंडच्या दिवसात अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे माथेरान पुरवते हादरले आहे.


हेही वाचा : Omicron Variant: ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी ICMR कडून आरटी-पीसीआर किटची निर्मिती, २ तासात अहवाल मिळणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -