घरताज्या घडामोडीडोक्यात दगड घालून एकाची हत्या

डोक्यात दगड घालून एकाची हत्या

Subscribe

तपोवनातील गोपालदास आश्रमात ये-जा करणार्‍या इसमाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्रकार सोमवारी (दि.३) सकाळी उघडकीस आला. मृत व्यक्ती तपोवनातील एका गो-शाळेमध्ये काम करत असल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली. गांजा पिण्यावरूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. संतोष पवार (रा. हिरावाडी पंचवटी) असे हत्या झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तपोवनात बटुक हनुमान मंदिराच्या शेजारी गोपालदास महाराज यांची कुटिया आहे. २०१४ साली झालेल्या कुंभमेळ्यापासून ही कुटिया अस्तित्वात आहे. गोपालदास महाराज यांच्या कुटियामध्ये अनेक जण गांजा पिण्यासाठी येत असतात. संतोष पवार या ठिकाणी नेहमीच येत होता. ते रविवारी (दि.२) रात्री प्रमाणे संतोष पवार गोपालदास महाराज यांच्या आश्रमात आला होते. रात्री उशीरापर्यंत आश्रमातील धुनीसमोर बसून होते. त्यानंतर ते गोपालदास महाराज कुटीयात झोपायला निघुन गेले. रात्री ३ वाजेच्या दरम्यान अनोळखी व्यक्तींनी संतोष पवार याच्या डोक्यात दगड घातून हत्या केली. सोमवारी सकाळी गोपालदास महाराज झोपेतून उठल्यानंतर पवार याची हत्या झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ आडगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी विड्या व चिलीम आढळून आल्या आहेत.पोलिसांनी गोपालदास महाराजांची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी अश्विनी संतोष जाधव हिने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

तपोवन परिसर गर्दुल्यांचा हॉटस्पॉट

नाशिकमधील तपोवन परिसर गर्दुल्ल्यांचा अड्डा म्हणून प्रचलित आहे. या भागात दिवसरात्र गांजा पिणारे, दारू पिणार्‍यांच्या टोळ्या, प्रेमीयुगल सर्रासपणे आढळून येतात. तपोवन परिसर हा कुंभमेळ्याच्या व्यतिरिक्त सुनसान असल्याने दारुड्यांसाठी हॉटस्पॉट बनला आहे. आडगाव पोलीस पेट्रोलिंग करताना तात्पुरत्या कारवाईचा फार्स दाखवतात. मात्र, टोळ्यांवर कारवाई करण्याचे धाडस पोलीस का करत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -