अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीच्या प्रियकराची हत्या; पती फरार

१५ दिवसांपूर्वी दोघांचे भांडण झाले. त्यातून घरमालकाने गव्हाणे यास घर खाली करण्यास सांगितले होते.

29 year old woman kills husband after argument arrested in nalasopara
धक्कादायक: विरारमध्ये धारदार चाकू खुपसून पत्नीने केली पतीची हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पतीने पत्नीच्या प्रियकराची कोयत्याने सपासप वार करत हत्या केल्याची घटना पाथर्डी गावात घडली आहे. या घटनेत नरपतसिंह गावीत मृत झाले आहेत. तर मारेकरी विठ्ठल गव्हाणे फरारी झाला आहे. पोलिसांनी माहितीनुसार, नरपत सिंह व विठ्ठल गव्हाणे हे दोघे पाथर्डी गाव येथे शेजारी राहत आहेत. १५ दिवसांपूर्वी दोघांचे भांडण झाले. त्यातून घरमालकाने गव्हाणे यास घर खाली करण्यास सांगितले होते.

अशी घडली घटना

नरपतसिंह गावित शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास कंपनीत जाण्यासाठी निघाले होते. गौळाणे रस्त्यावर नरपतसिंह गावितवर गव्हाणे याने कोयत्याने वार केले. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रय पाळदे, संदीप लांदे, जावेद खान, सागर पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत गव्हाणे फरार झाला. उपचारासाठी पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना सकाळी १०.३० वाजेदरम्यान त्याचा मृत्यू झाला. संशयित आरोपीच्या शोधार्थ गुन्हे शोध पथक रवाना झाले असून ही घटना अनैतिक संबंधातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.