घर क्राइम हत्या की अपघात? नवी मुंबईत 19 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

हत्या की अपघात? नवी मुंबईत 19 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Subscribe

नवी मुंबईतील एका पडीक इमारतीत 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तरुणी आपल्या दोन मित्रांसमवेत या पडीक इमारतीमध्ये पार्टी करण्यासाठी गेली होती, अशी माहिती समोर आली आहे.

नवी मुंबईतील एका पडीक इमारतीत 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तरुणी आपल्या दोन मित्रांसमवेत या पडीक इमारतीमध्ये पार्टी करण्यासाठी गेली होती, अशी माहिती समोर आली आहे. याच वेळी अंधारात तोल गेल्याने ती थेट सातव्या मजल्यावरून खाली पडली. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या दोन्ही मित्रांना ताब्यात घेतले असून या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. तर ही हत्या आहे की अपघात याचा देखील पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा – Sharad Pawar, Sanjay Raut धमकी : गुन्हा दाखल, दोघेजण ताब्यात; पोलीस Action मोडवर

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी गेल्या दोन दिवसांपासून तिच्या प्रियकराच्या घरी राहत होती. गुरुवारी सकाळी तिच्या प्रियकराने त्याच्या एका मित्राला घरी बोलावून पार्टी करण्याचा बेत आखला. त्यानुसार त्यांनी सर्व तयारी केली. पण तरुणीने आणि तिच्या प्रियकराने घरी आई येईल म्हणून घराच्या बाहेर पार्टी करण्याचा निर्णय केला. त्यानुसार, तरुणी, तिचा प्रियकर आणि प्रियकराचा मित्र असे तिघेही बेलापूर मधील एका पडीक इमारतीत गेले. या पडीक इमारतीत त्यांनी सातव्या मजल्यावर जाऊन पार्टी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिघांची पार्टी सुरु झाली.

याचवेळी तरुणीचा प्रियकर लघुसशंकेसाठी उठून बाजूला गेला. तेव्हा ती तरुणीही त्याच्या मागे गेली. मात्र अंधाराचा अंदाज न आल्याने तरुणीचा पाय घसरून ती थेट इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला आहे. प्राथमिक माहिती नुसार तरुणीने मद्याचे सेवन केले होते. त्यामुळे ती पाय घसरून पडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.

तर तरुणीचा प्रियकर हा बेलापूरमधील डी-मार्टमध्ये काम करतो. तर या पार्टीला त्यांच्यासोबत असलेला मित्र हा कामोठेमधील ह्यंदाई शोरूममध्ये कामास आहे. मृत तरुणी आणि तिच्या प्रियकराचे लवकरच लग्न होणार होते. त्यांच्या आई-वडिलांनीही लग्नाला होकार दिला होता. त्यामुळे तिचे प्रियकराच्या घरी येणं-जाणं होतं, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे

परंतु, पोलिसांना अद्यापही यामध्ये काही तरी संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांकडून या दोन्ही तरुणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या तरुणीचा खरंच तोल जावून पडल्याने मृत्यू झाला की तिची हत्या करण्यात आली, याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या घटनेनंतर तरुणीचा मृतदेह पोलिसांनी वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

- Advertisment -