घरताज्या घडामोडीबिघडलेला लॅपटॉप दुरूस्तीला दिला अन् समोर आले बोगस डॉक्टरचे ‘हे' उद्योग

बिघडलेला लॅपटॉप दुरूस्तीला दिला अन् समोर आले बोगस डॉक्टरचे ‘हे’ उद्योग

Subscribe

बिघडलेला लॅपटॉप दुरूस्तीला देणे एका बोगस डॉक्टरच्या अंगलट आल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील मुरगुड येथील एका बोगस डॉक्टरने अनेक महिलांशी अश्लील चाळे केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.

बिघडलेला लॅपटॉप दुरूस्तीला देणे एका बोगस डॉक्टरच्या अंगलट आल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील मुरगुड येथील एका बोगस डॉक्टरने अनेक महिलांशी अश्लील चाळे केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. डॉक्टरने त्याचा लॅपटॉप दुरूस्तीसाठी दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी डॉक्टरविरोधात त्वरीत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (murgud doctor viral video 80 clips of women leaked by fake doctor)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगड येथे संबंधित बोगस डॉक्टरने त्याचा दवाखाना सुरू केला होता. त्याने या दवाखान्याची जाहीरात केली होती. ही जाहीरात पाहून राज्यभरातून नागरिक त्याच्याकडे उपचार घेण्यासाठी येत होते. त्यावेळी उपचारसाठी आलेल्या महिलांसोबत तो अश्लील चाळे करायचा. तसेच त्याचे स्वत:च्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करायचा. विशेष म्हणजे, यामध्ये स्थानिक महिलांसह तरुण मुलींचाही समावेश आहे. या क्लिप आता सोशल मीडियावर पसरल्या असून त्यातील बहुतांशी महिलाही स्थानिकच असल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

- Advertisement -

दरम्यान, आरोपी डॉक्टरने महिलांशी अश्लील चाळे करतानाचे अश्लील व्हिडिओ तयार करून लॅपटॉपमध्ये ठेवल्या होत्या. मात्र, त्याचा लॅपटॉप खराब झाला. हा लॅपटॉप दुरूस्तीला दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. या डॉक्टरने महिलांशी अश्लील चाळे केल्याच्या सुमारे ७० ते ८० क्लिप व्हायरल झाल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व क्लिप आरोपी डॉक्टरने स्वत:च तयार केल्या असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

दरम्यान, मुरगूड परिसरात गेल्या काही दिवसांपासून या क्लिप अनेकांच्या मोबाईलपर्यंत पोहचल्या. पण बदनामीच्या भितीने कोणत्याही महिलाने तक्रार दिली नाही. मात्र, शनिवारी यासंबंधित चारशेहून अधिक निनावी पत्रे समोर आली आहेत. तसेच याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणींनीही जोर धरला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी! अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -