घरमनोरंजनMusic Festival : सांस्कृतिक विभागातर्फे मुंबईत 26 ते 28 मार्चदरम्यान संगीत सोहळ्याचे...

Music Festival : सांस्कृतिक विभागातर्फे मुंबईत 26 ते 28 मार्चदरम्यान संगीत सोहळ्याचे आयोजन

Subscribe

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे प्रख्यात गायिका पद्मश्री माणिक वर्मा, ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित राम मराठे, नाटककार-गीतकार-पत्रकार विद्याधर गोखले आणि प्रख्यात हिंदुस्तानी ख्यालगायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्यावरील तीन दिवसीय संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 26 ते 28 मार्च या कालावधीत माटुंगा येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे होणार असून तो सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.

हेही वाचा – CJI Chandrachud : ट्रोलिंगचा त्रास मलाही; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची व्यथा

- Advertisement -

पं. राम मराठे, विद्याधर गोखले, पं. सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच संगीत महोत्सवामध्ये प्रख्यात गायिका माणिक वर्मा यांच्या सांगीतिक प्रवासाचे दर्शन घडवणारा आगळा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला आहे.

पं. राम मराठे यांचे सुपुत्र प्रसिद्ध गायक आणि अभिनेते मुकुंद मराठे, त्यांची सुकन्या अर्थातच पं. राम मराठे यांची नात गायिका आणि अभिनेत्री स्वरांगी मराठे, प्रख्यात गायक अभिनेते ज्ञानेश पेंढारकर आणि अभिनेत्री नीलाक्षी पेंढारकर, पंडित सी. आर. व्यास यांचे सुपुत्र प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित सुहास व्यास, गायिका मधुरा कुंभार, केतकी चैतन्य आदी कलावंतांसह अमेय ठाकूरदेसाई, हनुमंत रावडे, सागर साठे, झंकार कानडे, धनंजय पुराणिक, मकरंद कुंडले, महेश कानोले, श्रीनिवास आचार्य या वादक कलाकार मंडळींची साथसंगत राहील.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मुख्यमंत्र्यांसमोरच नाशिकच्या हेमंत गोडसेंचे शक्तिप्रदर्शन, शिंदेंकडून शब्द

आपल्या आई-वडीलांच्या आठवणी सांगण्यासाठी प्रख्यात गायिका राणी वर्मा, मुकुंद मराठे आणि पंडित सी. आर. व्यास यांचे सुपुत्र शशी व्यास तसेच प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध निवेदिका अस्मिता पांडे, प्रसिद्ध दूरदर्शन निवेदक अमेय रानडे आणि प्रख्यात निवेदक नरेन्द्र बेडेकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.

मंगळवारी (26 मार्च) सायंकाळी 5.30 वाजता ‘हसले मनी चांदणे’ हा माणिक वर्मा यांच्या गीतांवरील कार्यक्रम; बुधवारी (27 मार्च) दुपारी 4.30 वाजता पंडित राम मराठे आणि नाटककार विद्याधर गोखले यांच्यावरील संयुक्त कार्यक्रम ‘जय शंकरा – विद्याधरा’ आणि गुरुवारी (28 मार्च) सायंकाळी 5.30 वाजता पंडित सी. आर. व्यास यांचे सुपुत्र पंडित सुहास व्यास यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : चंद्रपूरचा गड राखेन, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना विश्वास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -