घरमहाराष्ट्रनागपूरनागपुरात जागतिक दर्जाचे म्युझिकल फाऊंटन, राज ठाकरे-नितीन गडकरी फुटाळा तलावावर एकत्र

नागपुरात जागतिक दर्जाचे म्युझिकल फाऊंटन, राज ठाकरे-नितीन गडकरी फुटाळा तलावावर एकत्र

Subscribe

म्युझिकल फाऊंटनचा शो एकदा बघितला पुन्हा पाहायला येऊ नका. कारण पुन्हा गर्दी नियंत्रणात आणणे शक्य होणार नाही. गर्दी वाढत गेली तर शो बंद करावा लागेल, असं नितीन गडकरी म्हणाले. तसंच,  सध्या दिवसाला दोन शो होत आहेत. पहिला शो सायंकाळी सात वाजता सुरू होतो. त्याची वेळ बदलून साडेसहा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून सायंकाळी तीन शो करता येतील. 

नागपूर –  नागपुरात जागतिक दर्जाचं म्युझिकल फाऊंटन तयार करण्यात आलं आहे. हे म्युझिकल फाऊटंन भारतात कुठेही नसून जागतिक दर्जाचं आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी म्युझिकल फाऊंटनबाबत सविस्तर माहिती दिली. तसंच, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.

नितीन गडकरींनी सांगितली म्युझिकल फाऊंटनची वैशिष्ट्ये

- Advertisement -
  • ‘म्युझिकल फाऊंटन’च्या ‘गॅलरी’त चार हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, येथे १२ मजल्यांची इमारत बांधण्यात येत असून येथे अकराशे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. याच इमारतीवर फूडपार्क असणार आहे. येथे सामन्य नागरिकांना परवडेल असं खाद्य चाखायला मिळणार. तसंच, मॉल आणि मल्टिप्लेक्सही असणार आहे.
  • इमारतीच्या बाराव्या मजल्यावर फिरते रेस्टॉरंट उभारण्यात येणार आहे.  यासाठी दोन मेगावॅट वीज लागणार असून सौरऊर्जेचा ‘पॉवर’ देण्याचा प्रयत्न असणार आहेत.  १८० मीटर्सचे हे ‘फ्लोटिंग फाऊंटन’ आहे. हार्डवेअरचे बहुतांश काम नागपूरकर तज्ज्ञांकडूनच पूर्ण करण्यात आले असून बॉटनिकल गार्डनमध्ये समुद्राप्रमाणे चौपाटी उभारणार असल्याचीही माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
  • फ्लावर गार्डनही येथे उभारण्यात येणार असून येथे साडेपाच हजार जातीची गुलाबाची फुलं असणार आहे. असं गार्डन भारतातील पहिलं गार्डन असेल. तसंच, येथे पक्षांसाठीही पार्क उभारण्यात येणार आहे. तेलंगखेडी बगीचाचे सौंदर्यीकरण व लँडस्केपिंग होणार असूून तेथूनही म्युझिकल फाऊंटनसाठी ‘एन्ट्री’ असेल.
  • ‘म्युझिकल फाऊंटन’चा प्रत्येक ‘शो’ ३४ मिनिटांचा आहे. या शोमध्ये पाण्याच्या रंगीबेरंगी स्क्रीनवर नागपूरचा इतिहास प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात येतो. त्याची कॉमेंट्री इंग्रजीतून अमिताभ बच्चन, हिंदीतून गुलजार आणि मराठीतून नाना पाटेकर यांनी केली आहे. तसंच, याला ए.आर.रहमान यांचे संगीत लाभलं असून ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर रेसूल पोकुट्टी यांनी साऊंड डिझाईन केले आहे.

एकदा शो बघितला की पुन्हा येऊ नका

म्युझिकल फाऊंटनचा शो एकदा बघितला पुन्हा पाहायला येऊ नका. कारण पुन्हा गर्दी नियंत्रणात आणणे शक्य होणार नाही. गर्दी वाढत गेली तर शो बंद करावा लागेल, असं नितीन गडकरी म्हणाले. तसंच,  सध्या दिवसाला दोन शो होत आहेत. पहिला शो सायंकाळी सात वाजता सुरू होतो. त्याची वेळ बदलून साडेसहा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून सायंकाळी तीन शो करता येतील.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -