आम्ही शांत आहोत याचा गैरफायदा घेऊ नका अन्यथा..,पाकिस्तान झिंदाबाद घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही मुस्लीम तरुणांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी पीएफआयच्या सुमारे ४१ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, आम्ही शांत आहोत याचा गैरफायदा घेऊ नका, असा इशारा मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यांनी दिला आहे.

औरंगाबादेत झियाउद्दीन सिद्दिकी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी झियाउद्दीन सिद्दिकी म्हणाले की, पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता औरंगाबादेत विविध जातीधर्मांच्या लोकांची मदत केली. कोविड मृतावर अंत्यसंस्कार केले. परंतु सरकारविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. हे खोटे गुन्हे रद्द करुन त्यांची निर्दोष मुक्तता करावी. आम्ही शांत आहोत, याचा गैरफायदा घेऊ नका. अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू, असा इशारा झियाउद्दीन सिद्दिकी यांनी दिला आहे.

ज्या युवकांना अटक झाली त्यांना आम्ही ओळखतो. ते सर्वजण निर्दोष आहेत. या तरुणांचा दोष काय?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा – नाना पटोले

दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयए, ईडी या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड करताना पुण्यात काही लोकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणाऱ्या व दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणतीही संघटना धार्मिक उन्माद घालत असेल तर त्यावर बंदी घातली पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

नेमके काय घडले ?

पुण्यात PFI वरील कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. धक्कादायक म्हणजे आक्रमक आंदोलनकर्त्यांकजून यावेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा : वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गमावण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार, चंद्रशेखर बावनकुळेंचा