घरताज्या घडामोडीहिंदू आक्रोश मोर्चावरून मुस्लीम विचारवंतांचे मोहन भागवतांना पत्र; वाचा नेमके प्रकरण काय?

हिंदू आक्रोश मोर्चावरून मुस्लीम विचारवंतांचे मोहन भागवतांना पत्र; वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुस्लीम समाजाच्या विरोधात मोर्चे निघत आहेत. या मोर्चावरून मुस्लीम विचारवतांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात मुस्लीम विचारवंतांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुस्लीम समाजाच्या विरोधात मोर्चे निघत आहेत. या मोर्चावरून मुस्लीम विचारवतांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात मुस्लीम विचारवंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम विचारवंतांनी मोहन भागवत यांना हस्तक्षेप करावा आणि मुस्लीमविरोधी कारवायांना प्रतिबंध करावा, अशी मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, AEEDU (Alliance for Economic and Educational Empowerment of the Underprivileged) या संघटनेतील लोकांनी हे पत्र मोहन भागवतांना लिहिले आहे. या पत्रावर दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस. वाय. कुरेशी, राज्यसभेचे माजी खासदार शाहीद सिद्दीकी, निवृत्त लेफ्टनंट जनरल यू. शाह आणि सईद शेरवानी यांची स्वाक्षरी आहे. २३ मार्च रोजी हे पत्र सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पाठविण्यात आले असून हे सगळे AEEDU या संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत.

- Advertisement -

संघ आणि मुस्लीम समाजात संवादाचा दुवा राखण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. हिंदू आणि मुस्लीम समाजांत असणारी दरी कमी करून महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या मंचाचा वापर करण्यात येतो.

या पत्रात काय?

- Advertisement -

संघाच्या राष्ट्रबांधणीच्या कामाबाबत कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. जर सर्व समाजांना एकत्र घेतले नाही, तर राष्ट्रबांधणी होऊ शकणार नाही. यामध्ये देशातील २० टक्के अल्पसंख्याकांना सोबत घेतल्याशिवाय राष्ट्रनिर्मिती कशी होणार? यामुळे संघाकडून किंवा संघाशी निगडित संघटनांकडून जर चिथावणीखोर वक्तव्ये होत असतील तर त्याला संघाने विरोध केला पाहीजे. प्रेम आणि सद्भावना वाढीस लागेल, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. तुम्ही याबद्दल अनेकदा आवाहन केलेले आहे. जे सामाजिक सद्भावनेला तडा जाईल असे वक्तव्य करत असतील त्यांना समज देण्याचे काम संघाचे सरसंघचालक म्हणून आपण किंवा राज्य सरकारांनी करावे.


हेही वाचा – संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाने पोलिसांना दिले चौकशीचे आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -