घरमहाराष्ट्रअजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली; अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरुन आरोप-प्रत्यारोप

अजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली; अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरुन आरोप-प्रत्यारोप

Subscribe

नाना पटोलेंनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता राजीनामा दिला. तसेच, राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली, असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या आरोपांनंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या निर्णयावर अजित पवार आणि नाना पटोले यांच्यात चांगलीच जुंपल्यांच दिसून येत आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला. नाना पटोलेंनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता राजीनामा दिला. तसेच, राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली, असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या आरोपांनंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या निर्णयावर अजित पवार आणि नाना पटोले यांच्यात चांगलीच जुंपल्यांच दिसून येत आहे. ( MVA Ajit Pawar and Nana Patole clashed Accusations and counter accusations on the resignation of the President post )

अजित पवार काय म्हणाले?

प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं. मात्र, पुढे काय झालं? यामध्ये एक तर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता देण्यात आला. राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली. एक तर तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. तेही दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून झालं नाही, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: नैतिकता असेल तर भाजपच्या मतांवर निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा – आशिष शेलार )

नाना पटोलेंचा पलटवार काय?

अजित पवार खोटं बोलत आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि मी एकत्र अजित पवार, उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यांना भेटून मी सांगितलं की मला आदेश आला आहे, मला अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांनी मला त्यावेळी थोडं थांबायला सांगितलं होतं हे खरंय, पण मी लगेच राजीनामा दिला, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

नाना पटोले म्हणाले की, मी अध्यक्षपदावर नव्हतो पण उपाध्यक्ष तर त्यांचा होता, मग त्यांना अपात्रतेची कारवाई करता आली असती ती त्यांनी केली नाही. उपाध्यक्षांकडे माझ्या पश्चात सर्व अधिकार होते त्यांनी ते का वापरले नाहीत? असं म्हणत पटोले यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

त्यामुळे आता नाना पटोलेंच्या या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून किंवा अजित पवार काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -