कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी लढणार निवडणूक, पुण्यात मविआविरुद्ध भाजप 

tripura assembly elections 2023 Tripura Election voting percentage polling booth bjp congress tipra motha tripura exit polls latest news

पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात येत्या 26 फेब्रुवारीला पोटनिवडणुक होणार आहे. यासाठी भाजपने कसब्यातून पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि चिंचवडमधून आश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात आता महाविकास आघाडीनेही कसब्यातून काँग्रेस आणि चिंचवडमधून राष्ट्रवादी लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. यासाठी कसब्यात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे उमेदवारआहेत. यामुळे भाजपला या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये मविआने धक्का देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला होता, मात्र चिंचवडमध्ये उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत धुसफूस सुरु होती. परंतु रविवारी सायंकाळी शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यातील चर्चेनंतर चिंचवडची जागा राष्ट्रवादीने सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. दरम्यान चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्याने त्यांचे दीर शंकरशेठ जगताप भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये मतदानाआधीच भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कसबा पेठ निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धीरज घाटे, गणेश बीडकर, शैलेश टिळक, कुणाल टिळक आणि हेमंत रासने यांनी प्रयत्न केले होते. परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धक्कातंत्राचा वापर करत हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज उमेदवारांचा फटका भाजपला सहन करावा लागणार आहे. यात काँग्रेसने कसब्यातून गेल्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार अरविंद शिंदे यांना डावलत रविंद्र धंगेकर यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे 26 फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या दोन्ही निवडणुकांचा निकाल 2 मार्चला जाहीर होणार आहे.


कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले…