महाराष्ट्राला अद्याप १५ कोटी जीएसटी परतावा मिळणे बाकी : अजित पवार

महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने केंद्र सरकारने जीएसटीची देण्याची मागणी केली जात होती. अखेर केंद्राकडून महाराष्ट्राला १४ हजार कोटी रुपये जीएसटी परतावा देण्यात आला.

ajit pawar

महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने केंद्र सरकारने (Central Government) जीएसटीची देण्याची मागणी केली जात होती. अखेर केंद्राकडून महाराष्ट्राला १४ हजार कोटी रुपये जीएसटी परतावा देण्यात आला. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्याप १५ कोटी येणे बाकी असल्याचे म्हटले.

पत्रकार परिषद घेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याला मिळालेल्या जीएसटीच्या परताव्याची माहिती दिली आणि अद्याप किती जीएसटी येणे तसेच, कोणत्या वर्षाचा किती जीएसटी बाकी आहे, याबाबतही माहिती दिली. “महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) मार्च २०२२ पर्यंत केंद्र सरकारकडून २९ हजार ६४७ कोटी रुपये जीएसटी परतावा मिळणार होता. मात्र त्यापैकी केंद्राकडून महाराष्ट्राला १४ हजार कोटी रुपये जीएसटी परतावा दिला. अद्याप १५ हजार ५०२ कोटी रुपये जीएसटीचा परतावा येणे बाकी आहे.

वर्षानुसार जीएसटी परतावा येणे बाकी

त्यानुसार, वर्ष २०१९-२० चा १ हजार २९ कोटी रुपये जीएसटी परतावा (GST Return) येणे बाकी आहे. वर्ष २०२०-२१ चा ६ हजार ४७० कोटी रुपये जीएसटी परतावा येणे बाकी आहे. वर्ष २०२१-२२ चा ८ हजार ३ कोटी रुपये जीएसटी परतावा येणे बाकी आहे. असे एकूण १५ हजार कोटी येणे बाकी आहे”, असे अजित पवार यांनी सांगितले.

देशातील २१ राज्यांनाही जीएसटीचा परतावा दिला. २१ राज्यांचा मिळून एकूण ८६ हजार ९१२ कोटी रुपयांचा परतावा केंद्र सरकारकडून वितरित करण्यात आला आहे. मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारही सतर्क झाले आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.


हेही वाचा – केंद्र सरकार निवडणुका आणि राजकारणात गुंतून पडलंय, काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही; संजय राऊतांचा टोला