‘मविआ’नेच शेतकऱ्याचे भले केले, तुम्ही नाही करू शकत; भास्कर जाधवांचा शिंदे गटाला टोला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्याएकनाथ शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारचे निर्णय स्थगित करण्याचा व रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. सरकार स्थापनेनंतर शिंदे सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारला अनेक धक्के दिले.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्याएकनाथ शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारचे निर्णय स्थगित करण्याचा व रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. सरकार स्थापनेनंतर शिंदे सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारला अनेक धक्के दिले. शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकाच्या रद्द केलेल्या निर्णयाचा मुद्दा विधानसभेत माडला. तसेच, ‘या महाविकास आघाडीनेच शेतकऱ्याचे भले केलेले आहे, तुम्ही शेतकऱ्याचे भले करू शकत नाही’, असे म्हणत शिंदे गटाला टोला हाणला. (MVA government who did good to the farmer you cannot Bhaskar Jadhav challenge to the Shinde group)

“१ एप्रिल २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय तुम्ही स्थगित केले. साधा विचार करा त्यावेळी सरकारमध्ये तुम्हीसुद्धा होता. समोर बसलेले तिन्ही मंत्री होतात. अरे नवीन सरकार भाजपाला भाजपचा कार्यक्रम राबवायचा असेल, तर त्यांनी नवीन निर्णय घ्यावेत. तुम्हीच घेतलेले निर्णय रद्द करत आहेत. नगरपालिका निवडणूका, जिल्हा परिषद निवडणूका, कामांचा स्टे. अरे तुम्ही म्हणायला पाहिजे होतात, की आम्ही त्या सरकारमध्ये आहोत”, असे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले.

“आम्ही सुद्धा त्याला तितकेच जबाबदार आहोत आणि तितक्या फायद्याचे लाभार्थी आहोत. आम्ही सुद्धा याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटलं असतात, तर तुम्ही मला स्वाभिमानी वाटलं असतात. पण कशासाठी हे करत आहात. सत्तेकरता, मंत्रिपदाकरता. अब्दुल सत्तार मला तमच्याकडून अपेक्षा आहेत. तुम्ही पेटून उभे राहणारे आहेत. त्यामुळे दुध का दुध आणि पाणी का पाणी हे भविष्यामध्ये होईल. या महाविकास आघाडीनेच शेतकऱ्याचे भले केलेले आहे, तुम्ही शेतकऱ्याचे भले करू शकत नाही”, असेही आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले.

भास्कर जाधव यांनी तुम्ही तीन मंत्रीही मागील सरकारमध्ये होता, असे म्हटले त्यावर शिंदे गटाचे आमदार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्यत्तर दिले. “मोठ्यांनी बोललेले सर्व खरे असते असे नाही. जे निर्णय थांबलेले आहेत, त्याची चौकशी केली जात आहे. जे निर्णय घाईगडबडीत घेण्यात आले, त्यामध्ये वित्तीय तरतूद आहे. तसेच, वित्तय तरतुद किती रकमेची आणि मान्यता किती रकमेची आहे. या सगळ्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे चौकशी संपूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री त्यानप निर्णय घेतली”, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले.

महाविकास आघाडी सरकारचे निर्णय स्थगित

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्याएकनाथ शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारचे निर्णय स्थगित करण्याचा व रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. सरकार स्थापनेनंतर शिंदे सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारला अनेक धक्के दिले आहेत. आतापर्यंत शिंदे सरकारने महापालिका प्रभाग रचना, मेट्रो कारशेड प्रकल्प, बुलेट ट्रेन आदि निर्णय रद्द केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी आधीच्या सरकारने मंजूर केलेले निधी रोखले आहेत. तर महाविकास आघाडीने घेतलेले महत्त्वाच्या निर्णयांना देखील स्थिगिती काढून नव्याने शासन आदेश काढण्यात आले आहेत.


हेही वाचा – श्रीवर्धनमध्ये आढळलेल्या बोटीच्या घटनेने मुंबईत नाकाबंदी; महाराष्ट्रात हायअलर्ट