घरमहाराष्ट्रMVA : महाविकास आघाडीचं ठरलं; जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच

MVA : महाविकास आघाडीचं ठरलं; जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच

Subscribe

बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीची आजची बैठक ही निर्णायक झाली आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. फोन करुन उद्धव ठाकरे, शरद पवार बैठकीचा आढावा घेत होते. जागावाटप सुरळीतपणे पार पडलेलं आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भातील महत्त्वाची बैठक आज 28 फेब्रुवारी रोजी पार पडली. या बैठकीनंतर खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीचं जागावाटप झालं असून, याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती माध्यमांनी दिली. (MVA Mahavikas Aghadi has decided Official announcement of seat allotment soon)

बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीची आजची बैठक ही निर्णायक झाली आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. फोन करुन उद्धव ठाकरे, शरद पवार बैठकीचा आढावा घेत होते. जागावाटप सुरळीतपणे पार पडलेलं आहे. तिन्ही पक्षात कुठलेही मतदभेद नाहीत. तर वंचित बहुजन आघाडीचा जो प्रस्ताव आला, त्यामध्ये त्यांनी काही मतदारसंघाची यादी दिली. त्यावर आम्ही सगळे मिळून विचार करु अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

- Advertisement -

यावेळी खासदार संजय राऊत यांना वंचितच्या फॉमुलाबाबत विचारले असता ते म्हणाले की, शेवटी आम्हा सगळ्यांना या देशामध्ये लोकशाही, संविधान, वंचिताचं रक्षण करण हा आमचा अजेंडा आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. या बैठकीत सर्व जागांवर सविस्तर चर्चा केली. कोण कोठे जिंकेल यावर चर्चा झाली. कोण कुठे जिंकते हे महत्त्वाचे आहे. कोण किती जागांवर लढतेय हे महत्त्वाचे नाही. ही जी आमची भूमिका आहे तीसुद्धा प्रकाश आंबेडकर यांचीही आहे. असेही यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा : Neelam Gorhe : महामार्गासह, तीर्थक्षेत्र परिसरातील स्वच्छतागृहे सुस्थितीत ठेवा; नीलम गोऱ्हेंचे आदेश

- Advertisement -

महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा करत आहोत. स्वतंत्रपणे कुठलीही चर्चा करत नाही. त्यामध्ये मग वंचित बहुजन आघाडीचासुद्धा समावेश आहे. तर वंचित बहुजन आघाडीने प्रस्ताव दिला नाही, त्यांनी इच्छा व्यक्त केली. परंतु महाराष्ट्रात 48 जागा असून, त्या सर्व पक्षांना वाटूनच लढाव्या लागतील. ज्यांची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्या जागेवर आम्ही चर्चा करत आहोत.

हेही वाचा : Election Commission : एस.चोकलिंगम नवे मुख्य निवडणूक अधिकारी; देशपांडेंची तडकाफडकी बदली

मनोज जरांगे यांच्या प्रस्तावाबाबत विचारले असता खासदार संजय राऊत म्हणाले की, मनोज जरांगेबाबत कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. तर यापुढे महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत कुठलीही बैठक होणार नाही. याचा अर्थ महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले आहे आणि तेही महाविकास आघाडीसह असेही यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -