घरमहाराष्ट्रMVA : महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

MVA : महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

Subscribe

यापूर्वी संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती यांचे नाव शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी चर्चेत होते. पण आता संभाजीराजेंचे नाव चर्चेत आले आहे. यामुळे संभाजीराजे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात राजकारणला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक पक्षात जागावाटपाच्या चर्चा सुरू आहे. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असलेले कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती याबाबत महत्वाची बातमी माध्यमातून येत आहे. संभाजीराजे छत्रपती हे महाविकास आघाडीत सहभागी झाले तर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळत सुरू आहे.

संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य संघटना हा पक्ष महाविकास आघाडी समावेश करावा, अशी अट त्यांनी ठेवली आहे. स्वराज्य संघटना पक्ष महाविकास आघाडीत समावून घेतल्यानंतर त्यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित असेल, अशी माहिती मिळाली आहे. यापूर्वी संभाजीराजे हे राज्यसभेचे खासदार होते आणि त्यांनी दीड वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. पण शिवसेनेकडून अटी घातल्या होत्या. पण या अटी संभाजीराजेंना मान्य नसल्यामुळे नव्हता.

- Advertisement -

हेही वाचा – Aaditya Thackeray : अन्याय फक्त महाराष्ट्रावरच का? आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट सवाल

संभाजीराजेंचा पक्ष विलीन करण्याची अट

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यात स्वराज्य पक्ष विलीन केला तर त्यांना निश्चित उमेदवारी मिळणार आहे, अशी माहिती मिळत आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झालेले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे यांना कोल्हापूरची जागा मिळू शकते, अशा बातम्या माध्यमातून येत आहेत. यापूर्वी संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती यांचे नाव शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी चर्चेत होते. पण आता संभाजीराजेंचे नाव चर्चेत आले आहे. यामुळे संभाजीराजे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -