मविआत जागा वाटपावरून खलबतं, शिवसेनेला कोणत्या जागा? अशोक चव्हाणांनी दिले संकेत

आगामी काळात येणाऱ्या निवडणुकींसाठी राज्यात महाविकास आघाडीकडून बैठकींचं सत्र सुरू आहे. पुण्यात भाजपाची दोन दिवसीय कार्यशाळा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचीही कार्यशाळा सुरू आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्येही बैठकींचं सत्र सुरू आहे. कारण महाविकास आघाडीसमोर तीन पक्षांमध्ये जागा वाटपाचे आव्हान असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत याबाबत खलबतं सुरू आहेत.

मागील आठवड्यात तिन्ही पक्षांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत लोकसभा, विधानसभा एकत्र लढविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु आता जागावाटपाची बैठक होणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी आपापल्या जागा कोणत्या असतील, यासाठी चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. मविआमध्ये पुन्हा एकदा बैठकांचं सत्र सुरू होणार असून त्या बैठकीत जागा वाटपांची बोलणी केली जाणार आहे.

ज्या जागा गेल्या काही वर्षात जिंकता आल्या नाहीत व जिथे ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्या जागा शिवसेनेला सोडल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर एखादी जागा सोडली तर त्या बदल्यात शिवसेनेकडून कोणती जागा घ्यायची यावर देखील रणनिती ठरवली जात आहे. या जागा वाटपाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी संकेत दिले आहेत.

दरम्यान, येत्या काळात या तिन्ही पक्षांमध्ये तारेवरच्या कसरतीचे राजकारण पाहायला मिळणार आहे. ठाकरे गटाचे खासदार आज नांदेडमध्ये आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मविआमध्ये जागांविषयी असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसून 2019 मध्ये लोकसभेच्या ज्या जागा आम्ही जिंकल्या होत्या, त्या आम्ही लढवणारच, असं खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा : Shivsena UBT : 2019 लोकसभेत जिंकलेल्या जागा लढवणारच, संजय राऊतांचा