घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात राजकीय उलथापालथ, महाविकास आघाडीतील दिग्गज नेते भाजप-आपच्या वाटेवर

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ, महाविकास आघाडीतील दिग्गज नेते भाजप-आपच्या वाटेवर

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या मागे ईडीची पिडा लागली आहे. आतापर्यंत विविध प्रकरणांमध्ये ईडी आणि आयटीने शिवसेना, काँग्रेस यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाया केल्या आहेत. तर काहीजणांची थेट तुरुंगात रवानगी झाली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची झोप उडाली असून काही जण भाजपच्या वाटेवर तर काहीजणांनी भाजपला पर्याय म्हणून आप ची वाट धरली आहे.

- Advertisement -

नुकत्याच पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार जागांवर भाजप तर एका जागेवर आप निवडून आले आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले असून पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवणाऱ्या आपचाही बोलबाला  आहे. या विजयामुळे अनेक पक्षातील नेते भाजपला पर्याय म्हणून आपकडे पाहात आहेत. त्यातही महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते आपमध्ये जाण्यास सर्वाधिक उत्सुक आहेत. सोमवारी राष्ट्रवादीचे खासदार मजीद मेमन यांनी एक टि्वट केले. ते म्हणाले की जर देशवासीय नरेंद्र मोदी यांना विजयी करत असेल आणि ते जगातील लोकप्रिय नेते असल्याचे सिद्ध होत असेल तर त्यांच्यात नक्कीच चांगले गुण असणार. काही कामे अशीही असतील जी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वेळेवर केले नसतील. या टि्वटमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना धक्का बसला असून मेमन लवकरच भाजपवासी होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. यावर मेमन यांनी स्पष्टीकरण दिले असून मी भाजपमध्ये जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पण मेमन यांचे अचानक उफाळून आलेले मोदी प्रेम बघून काँग्रेसचे नेते मात्र बुचकळ्यात पडले आहेत. पंजाबमध्ये सपशेल हरल्याने काँग्रेसच्या नेत्यांना आता आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. त्यातच आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये हातातून सत्ता गेल्यावर ती काँग्रेसला कधीच परत मिळवता आलेली नाही. यामुळे पंजाबमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करणे अशक्यच असल्याचे मत अनेक काँग्रेस नेते व्यक्त करत आहेत. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येही काहीच आलबेलं नसल्याने येत्या काही दिवसात काँग्रेस नेत्यांबरोबरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही अनेक नेते भाजप आणि आपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तृळात रंगू लागल्या आहेत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -