घरताज्या घडामोडीVideo: युट्यूबनं कितीही काड्या केल्या तरी मी संपणार नाही - इंदुरीकर महाराज

Video: युट्यूबनं कितीही काड्या केल्या तरी मी संपणार नाही – इंदुरीकर महाराज

Subscribe

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सम तिथीला मुलगा आणि विषम तिथीला मुलगी असा पुत्रप्राप्तीचा फॉर्म्युला सांगितल्या नंतर आरोग्य विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. यानंतर व्यथित झालेल्या इंदुरीकर महाराज यांनी काल बीडच्या परळी तालुक्यात कीर्तन करत असताना आपल्या भावना बोलून दाखविल्या. “कीर्तनामध्ये एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाही. मी बोललेलो अनेक ग्रंथात नमूद असल्याचे स्पष्ट केले. आपल्या विधानावरून निर्माण झालेल्या वादामुळे व्यथित झालेल्या निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी याचा आपल्याला त्रास होत असल्याचे स्पष्ट करत एक-दोन दिवस बघेल आणि कीर्तन सोडून शेती करेल”, असे म्हटले आहे.

इंदुरीकर महाराज

Sagar Parab ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 14, 2020

- Advertisement -

 

 

- Advertisement -

स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. असे विधान करून इंदुरीकर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांना नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर इंदुरीकर यांनी शुक्रवारी रात्री परळी (बीड) येथे झालेल्या कीर्तनामध्ये भाष्य केले. आपल्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादाचा हवाला देत त्यांनी आपल्याला याचा त्रास होत असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ समर्थकांनी समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. इंदुरीकर यांनी या संपूर्ण वादाचा ठपका युट्यूब चॅनल वर ठेवला आहे.

ते म्हणाले, “युट्युबवाले काड्या करतात. या यूट्यूब चैनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र चॅनल संपतील पण मी संपणार नाही. युट्युब आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागून मला संपवायला निघालेत. मी कशातही सापडेना म्हणून मला गुंतविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आता तर मी या मुद्द्यावर आलोय, आपली सहन करायची कॅपॅसिटी संपली. एखाद दुसरा दिवस जाऊ द्यायचा, फेटा ठेवून द्यायचा.”

“२६ वर्ष झाली कुटुंब सोडून रात्रंदिवस प्रवास, कष्ट, कष्ट, कष्ट करत लोकांसाठी फिरायचे. दोन-अडीच तासाच्या कीर्तनात एखादा वाक्य चुकीचे गेले असेल, मात्र मी बोललो ते चुकीचं नाही. सम तिथीला मुलगा आणि विषम तिथीला मुलगी हे भागवत, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. तरीदेखील लोक म्हणतात, ‘याला पहिलं ठेवून द्या’. गेल्या तीन दिवसात माझं वजन अर्धा किलोने घटले. युट्युबवाल्यांना इंदुरीकर यांच्या नावानं मोक्कार पैसा मिळाला आहे. ही मंडळी कोट्याधीश झाली. मी या युट्युबकडून एक रुपयाही घेतला नाही”, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -