घरमहाराष्ट्रप्रदीप शर्मा यांच्या पैशांचे बंडल माझे पती घरी घेऊन यायचे!

प्रदीप शर्मा यांच्या पैशांचे बंडल माझे पती घरी घेऊन यायचे!

Subscribe

 महिलेने सीआयडीला दिला जबाब

माझे पती घरी येताना काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीतून पैशांचे बंडल घेऊन यायचे आणि ते पैशांचे बंडल एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना द्यायला जायचे, असे अंधेरी येथे राहणार्‍या गुंजन सिंह या महिलेने सीआयडीच्या दिलेल्या जबाबात म्हटले आहे. गुंजन सिंह ही महिला अंधेरी येथे राहण्यास असून प्रदीप शर्माच्या अटकेनंतर ती समोर आली आहे.

अ‍ॅण्टिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला अटक झाल्यानंतर सोनू जालान, केतन तन्ना, मुनीर पठाण हे प्रदीप शर्मा याच्या विरोधात पुढे आले. या तिघांनी प्रदीप शर्मा विरोधात मुख्यमंत्री, गृहविभाग आणि राज्य पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यात त्यांनी प्रदीप शर्मा यांनी ठाण्यात असताना केलेल्या बेकायदेशीर कामाची माहीत दिली आहे. तसेच प्रदीप शर्मा व त्याच्या सहकार्‍यांनी मारहाण करून पैसे वसूल केल्याचा आरोप तक्रार अर्जात केला असून त्यात ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाचा देखील उल्लेख केला आहे.

- Advertisement -

या तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागकडे (सीआयडी) सोपवण्यात आले होते. दरम्यान अंधेरी येथे राहणार्‍या गुंजन सिंह या महिलेने देखील प्रदीप शर्मा यांच्यावर आरोप करून माझे पती अनिल सिंह हे प्रदीप शर्मा आणि परमबीर सिंह यांचे आर्थिक व्यवहार सांभाळत होते असा आरोप केला आहे.

सीआयडीने गुंजन सिंहला जबाब नोंदवण्यासाठी नवी मुंबईतील सीआयडी कार्यलयात येण्याचे समन्स बजावले होते. सोमवारी गुंजन सिंह हीचा सीआयडीने जबाब नोंदवून घेतला, त्यात तिने, माझे पती अनिल सिंह हे प्रदीप शर्माचे मित्र आहेत, त्याचे आर्थिक व्यवहार माझे पती बघायचे, घरी येताना माझे पती काळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅगमधून पैशांचे बंडल घेऊन यायचे आणि ते पैशाचे बंडल एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे असायचे, असे मला माझ्या सासू कडून कळले. तसेच अनेक वेळा माझ्या पतीला फोनवर बोलताना त्यांच्याकडून परमबीर सिंह यांचे नाव देखील मी ऐकले होते, असे गुंजन सिंह हिने सीआयडीच्या दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -